पिंपोडे बुद्रुक/ प्रतिनिधी/अभिजीत लेंभे
उत्तर कोरेगाव तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेले पिंपोडे बुद्रुक येथे
खुलेआम मटक्याचा अड्डा सुरू असून, पोलिस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांनी आरोप केला आहे.
पोलीस व एलसीबी, ॲडिशनल संगममत करून खुलेआम मटका चालतो. अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. पिंपोडे बुद्रुक एसटी स्टँड परिसरात मध्ये मटका राजरोज पणे सुरू असताना पोलीस किरकोळ कारवाई करत असतात व मटका पुन्हा चालू होते पण पोलीस कायमस्वरूपी मटका बंदीची कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
पिपोडे बुद्रुक परिसरात मध्ये विविध ठिकाणी मटका अड्डे सर्रास सुरू. असून पोलीस प्रशासनचे दुर्लक्ष. जिल्हा परिषद शाळेच्या काही अंतरावर अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजरोस बेकायदेशीर मटक्याचा अड्डा सुरू असल्याची नागरिकांतून वरड होत आहे.
अवैध धंदे सर्रासपणे सुरु झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
मटका अड्ड्यांवर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी मद्यपी मटका खेळत असल्याने भाविकांना जाणे तसेच युवती व महिलांना रस्त्याने चालणे मुश्कील बनले आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दिवसागणिक लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दिवसाढवळ्या खुलेआम सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर पोलिस प्रशासनाकडून जाणून बुजून कारवाई का केली जात नाही, असा सवाल पिंपोडे बुद्रुक नागरिक च्याकडून उपस्थित केला जात आहे