: विशाल माने
देवापूर

ग्राम विकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे निष्ठावंत सहकारी ,माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शंभुखेड विकास सेवा सोसायटी निवडणूकीत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शिव शंभो विकास पॅनल चा दणदणीत विजय झाला आहे.शंभू खेड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित शंभू खेड तालुका माण या संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६- २७ ते २०३० – ३१या निवडणुकीत
अत्यंत अटी तटीच्या या लढतीत शिव शंभू पॅनल ने १३/० ने दमदार विजय मिळवत विरोधकांना धूळ चारत एक हाती सत्ता प्रस्थापित केली.या निवडणुकीत सर्वसाधारण कर्जदार सभासद प्रतिनिधी देशमुख विलासराव आबा, काटे अंबादास रामचंद्र, देशमुख प्रल्हाद पांडुरंग, काटे रमेश नारायण, ननावरे तानाजी तुकाराम, काटे सदाशिव विष्णू,, ननावरे श्रीमंत पोपट, शिंदे भीमराव हरी, तर महिला राखीव मतदार संघातून देशमुख मीनाक्षी संतोष, जाधव सुवर्णा विठ्ठल, तर इतर मागास प्रवर्गातून नरळे आण्णा दत्तू, तर विशेष मागास प्रवर्गातून रूपनवर महादेव बिरू (देवबा), तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सरतापे सुभाष मोहन विजयी झाले आहेत.या निवडीबद्दल माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री विलासराव देशमुख व सर्व संचालकांचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे,, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुणआबा गोरे, डॉ.संदीप पोळ ,शिवाजीराव शिंदे, राजू पोळ,प्रशांत गोरड, प्रकाश कापसे, विनायक माने, पप्पू घाडगे यांच्यासह माण तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
