
म्हसवड….प्रतिनिधी
फाउंडेशन कोर्स नीट व सीईटी परीक्षेचा पाय आहे त्याचा लाभ घ्या.
विद्यार्थ्यावर अपेक्षेचे ओझं लादू नका केवळ त्यांच्या टक्केवारीपेक्षा सर्वांगीण प्रगतीची पक्केवरी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवडच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी केले.
क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आगामी शैक्षणिक वर्ष नियोजनाबाबत पालक मिटिंग आयोजित केली होती. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर., नूतन विभागाच्या मुख्याध्यापिका पुनम जाधव, शिक्षक,पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुलोचना बाबर म्हणाल्या क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील सर्वांगीण विकास हा शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांच्या त्रिवेणी समन्वयातून झालेला आहे. उपक्रमशीलता आमचा पाया आहे. सामान्य विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी अध्यापन केले जाते. पालकांना मार्गदर्शन करताना सुलोचना बाबर म्हणाल्या विद्यार्थ्यांवर केवळ टक्केवारीचे ओझं लादु नका . आपल्या हाताची पाच बोटं एकसारखे नाहीत मग सर्वच विद्यार्थी अति हुशार कसे असू शकतात असा प्रश्न बाबर यांनी केला. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात एक नंबर पर्यंत जाऊ शकतो हे भारतरत्न सचिन तेंडुलकर तसेच ऑलम्पिक पटू उपजिल्हाधिकारी ललिता बाबर यांनी दाखवून दिलेले आहे.
अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातून सुद्धा सामान्य विद्यार्थ्याने यशाचे शिखर गाठले असल्याची अनेक उदाहरणे बाबर यांनी दिली.
या मिटिंग निमित्त सुलोचना बाबर यांनी नवीन शैक्षणिक धोरण, ऑनलाइन शिक्षण , ए. आय. शिक्षण प्रणाली , विविध शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, पालकाचे कर्तव्य , टीव्ही मोबाईलचा अतिरेकी वापर इत्यादी बाबत पालकांचे प्रबोधन केले. अनेक शालेय राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी फाउंडेशन कोर्स मार्गदर्शन सुविधा गरजेची आहे. यानिमित्ताने नीट व सीईटी परीक्षेचा पाया मजबूत करण्यासाठी क्रांतिवीर संकुलात महत्त्वपूर्ण फाउंडेशन कोर्स सुरू केला असल्याचे सांगून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन सुलोचना बाबर यांनी केले.
विशेष म्हणजे या पालक मिटिंगसाठी महिला पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. उपशिक्षक अनिल काटकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले .