म्हसवड दि. १६
ज्ञानबा, तुकाराम असा गजर करीत म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर तहसिलदार मीना बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका कर्मचार्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या काढलेल्या दिंडी सोहळ्यामुळे शहरातील वातावरण अगदी भक्तीमय होवुन गेले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मोत्सवाला ७५० वर्ष पु्र्ण झाल्याने हा जयंती सोहळा राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीने पालखी काढुन साजरा करावा असा अद्यादेश राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने काढल्याने १५ ऑगष्ट या स्वातंत्रदिनाचे ध्वजारोहन संपन्न होताच पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सेहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यासाठी येथील विठ्ठल, रुक्मिणी भजनी मंडळाने पालिकेला मोलाची साथ दिली. टाळ, मृदुंगाच्या सुमधुर आवाजाने पालखी मार्ग भक्तीमय बनल्याचे दिसुन आले. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. माने यांनी स्वत: पालखी वाहक बनल्यााने कर्मचारी वर्गाचा आनंद द्विगुणित झाला. सर्व कर्मचारी व वारकर्यांनी पांढरे वस्त्र परिधान करीत या पालखी सोहळ्यात सहभागी होत ज्ञानेश्वर माऊलींचा गजर करीत टाळ, मृदुंगाच्या निनादात भक्तीगिते गात संपूर्ण शहराला नगर प्रदक्षणा घातली. यावेळी महिला कर्मचार्यांनी पालखी समोर फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. संपूर्ण शहराला नगर प्रदक्षणा घालुन हा दिंडी सोहळा पुन्हा पालिका कार्यालयासमोर आला तद्नंतर उपस्थित वारकरी व कर्मचारी, नागरिक यांच्याकडुन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महराजांची आरती संपन्न होवुन हा पालखी सोहळा संपन्न झाला.
चौकट –
अपर तहसिलदार मीना बाबर यांची प्रमुख उपस्थिती –
म्हसवड नगरपरिषदेने काढलेल्या या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अपर तहसिलदार मीना बाबर यांनी आवर्जुन उपस्थित रहात या पालखी सोहळ्यातील सहभागी महिला कर्मचार्यांंसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
फोटो –
