मुरूमच्या प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्याची एम.बी.बी.एस. साठी निवड

Spread the love

(मुरुम बातमीदार)

उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, मुरूम चा माजी विद्यार्थी शेख अब्दुलरहेमान सईदअहमद या विदयार्थ्याची ई.एस.आय.सी. मेडिकल कॉलेज, कलबुर्गी येथे प्रतिष्ठित एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

शालेय जीवनापासूनच अभ्यासात प्राविण्य मिळवणारे शेख अब्दुलरहेमान यांनी चिकाटी, कष्ट आणि मार्गदर्शनाच्या जोरावर ही यशाची शिखरे गाठली. त्यांच्या या यशामुळे शाळा, मुरूम शहर आणि कुटुंबियांचा अभिमान द्विगुणित झाला आहे.

या यशाबद्दल नगर शिक्षण विकास मंडळाचे विश्वस्त बसवराज पाटील ,अध्यक्ष बापूराव पाटील ,शरण पाटील, सचिव व्यंकटराव जाधव यांनी अभिनंदन केले . संस्थेच्या वतीने या यशस्वी विद्यार्थ्याचा गौरव अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आले होते .यावेळी माजी मुख्याध्यापक सच्चिदानंद अंबर ,शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा जोशी यांच्या शुभहस्ते शेख अब्दुलरहेमान सईदअहमद याचे सत्कार केले.
प्रा.डॉ.पुरुषोत्तम बारवकर धनराज हळळे ,संगमेश्वर लामजने यांनी अभिनंदन केले .

यावेळी पर्यवेक्षक विरेंद्र लोखंडे , सुभाष धुमाळ ,पंकज पाताळे सागर मंडले ,जगदीश सुरवसे ,सर्व शिक्षक,शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले .

“भविष्यात ते एक यशस्वी डॉक्टर होऊन समाजसेवेची नवी उंची गाठतील,” असा विश्वास सर्व शिक्षकांनी आपल्या अभिनंदनपर मनोगतातून व्यक्त केले .

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन शिक्षक जगदीश सुरवसे यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!