पंढरपूर रामेश्वर कोरे यांजकडून




*मुख्यमंत्री सचिवालय,मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष,धर्मादाय रुग्णालय सहायता निधी आणि अनुगामी लोकराज्य महाभियान अनुलोम ( अनुलोम) यांचे संयुक्त विद्यमाने “आरोग्याचा श्रीगणेशा “आरोग्य अभियानांतर्गत पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मातोश्री वृद्धाश्रम येथे श्री गणेशाची आरती करून तसेच श्री विठ्ठल मूर्तीची आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा करून
मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये 20 प्रकारच्या रक्त तपासण्या,नेत्र तपासणी, E C G तपासणी , इतर छोटे,मोठे आजारांवर तपासणी होऊन औषधोपचार करण्यात आले तसेच सहा जणांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी नाव नोंदणी करण्यात आली.
यावेळी सी एम आर एफ कक्षाचे सोलापूर जिल्हा प्रमुख डॉ.अविनाश जी खांडेकर सर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ जी बोधले,कासेगाव केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ.सौ. तनपुरे मॅडम,सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टर मंडळी,पंढरपूर ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स
आणि आशा वर्कर यांनी ही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती,तसेच गोपाळपूर च्या
विद्यमान सरपंच सौ.बनसोडे ,सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाऊ गुरव,राष्ट्रीय भारूडकार चंदाताई तिवाडी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश देशपांडे सर, अनुलोम चे विभाग प्रमुख शरद जी साळुंखे,उपविभाग प्रमुख पांडुरंग जी शिंदे,भाग जनसेवक रामेश्वर कोरे,अनुलोम चे मित्र विकास पाटील,सौ. जान्हवी सगर,जालिंदर सगर,संतोष मोटे,शिवराज भिंगे ,इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अनुलोम संस्थेबद्दल आज पर्यंत केलेल्या कामाची माहिती विभाग प्रमुख शरद जी साळुंखे यांनी दिली तर शिक्षक दिनानिमित सर्व उपस्थित शिक्षकांचा सन्मान उपविभाग प्रमुख पांडुरंग जी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच त्यांनी सर्वांचे आभार ही व्यक्त केले तर सूत्र संचालन रामेश्वर कोरे यांनी केले,
सर्व उपस्थित मान्यवर आणि शिबिरास आलेल्या लाभार्थ्यांना भोजनाची व्यवस्था गोपाळपूर येथील एकविरा मंच तर्फे करण्यात आली होती.
आजच्या या शिबिरात 238 लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले