
पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी/अभिजीत लेंभे
सरपंच नारायण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकास कामांच्या बाबतीत सर्वांना विचारात घेत गावाचा सार्वांगिण विकास घडवून आणलेल्या घिगेवाडी ता.कोरेगाव येथिल ग्रामस्थांच्या एकीचे दर्शन गणेशोत्सव विसर्जन कार्यक्रमात पुन्हा अनुभवायला मिळाले.गावातील सर्व ग्रामस्थांनी आपल्या घरगुती गणपतींचे एकञित विसर्जन केले.
लोकांना एकञ आणून त्या़ंच्यामध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्याच्या हेतूने लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव सर्वञ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात गणेशोत्सव मंडळांकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक कार्यक्रमांचे व्यासपीठ म्हणून या उत्सवाला वेगळेच महत्व आहे.
सर्वधर्मसमभाव जपत सर्वजण या उत्सवात मनोभावे सहभागी होत असतात.सार्वजनिक सण,उत्सवात महापुरूषांच्या थोर विचारांचे अनुकरण आजही होत आहे.राष्ट्भावना जोपसणाऱ्या एकीची हीच भावना जपण्याच्या हेतूने घिगेवाडी ग्रामस्थांनी एकञ येत घरगुती गणपतींचे वाजतगाजत एकञिरित्या विसर्जन केले.
दरम्यान घिगेवाडीकरांच्या हा उपक्रम आदर्शवत असून अनुकरणीय आहे.त्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.