हुल्लडबाजा वर कारवाई करा, पर्यटनावर निर्बंध नकोत.

Spread the love

साताऱ्यात हुल्लडबाज्यांना शिक्षे ऐवजी पर्यटन निर्बंध चुकीचे — श्री रमेश उबाळे


आज विशेषतः सातारा- जावळी- पाटण- महाबळेश्वर- वाई येथील स्थानिक हॉटेल व्यवसायिक व त्या आधारे इतर व्यवसायिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते श्री रमेश उबाळे यांची भेट घेतली .
गोरगरीब कष्टकरी स्थानिक भूमिपुत्र यांचा स्वयंरोजगार व रोजगार सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करावे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यानुसार श्री रमेश उबाळे यांनी सातारा जिल्हा प्रशासन व पोलीस दलाने तसेच स्थानिक भूमिपुत्रांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर वेळीच योग्य उपाययोजना केली असती तर ही वेळ आली नसते असे स्पष्ट केले. पर्यटनामुळे शेकडो भूमिपुत्रांचे उपजीविकेचे साधन आहे. म्हणूनच आम्ही हा प्रश्न हाती घेतला असेही सांगितले.

जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी पर्यटकांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खऱ्या पर्यटकांना नैसर्गिक आनंद घेण्यापासून परावृत्त केले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळ, व धरणे अशा पर्यटन स्थळांच्या परीसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असते . त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणा-या नागरीकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता दिनांक २० जून ते १९ ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहे. यामध्ये चांगल्या सूचना असल्या तरी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये जे अडथळे निर्माण करतात. त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही. वाहतूक अडथळा निर्माण होईपर्यंत वाहतूक विभागाने लक्ष दिले नाही. सुरक्षा रक्षक तैनात केले नाही. त्यामुळे शासकीय कामात कुचराई केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे होते. असे न करता सदर आदेशाचे कोणतीही व्यक्ती / संस्था / संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते भारतीय न्याय संहिता२०२३ चे कलम मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील. असे सूचित केले जात आहे. याबाबत पर्यटन वाढीसाठी निश्चित असे धोरण ठरवून विचार व्हावा. अन्यथा पर्यटन स्थळाच्या ठिकाणी व्यावसायिकांना विशेष भत्ता द्यावा .अशी मागणी श्री रमेश उबाळे यांनी केली आहे. आज त्यांनी पर्यटन स्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
……………………………….
फोटो– सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची पाहणी करताना सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश अनिल उबाळे (छाया– अजित जगताप सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!