म्हसवड वार्ताहर
पहाटे साडेसहा वाजेपर्यंत दर्शनरांगेतून सुमारे दीड लाख भाविकांनी या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
पहाटे साडेसहा वाजता पुन्हा सालकऱ्यांच्या हस्ते शिवलिंगास स्नान घालून, संपूर्ण भुयाराची स्वच्छता करून भुयाराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले.परंपरागत प्रथेनुसार सर्व धार्मिक विधी उरकून दरवर्षी
हे भुयार स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते.
दरम्यान ,चालू वर्षी या भुयारात एक सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवून हत्ती मंडपातील स्क्रीनवर भुयारातील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शनाचा लाभ असंख्य भाविकांना घेता आला,यामुळे तमाम भाविकांनी समाधान व्यक्त केले. वयोवृद्ध,लहान मुले,आजारीअसणारे यांना भुयारात जाता येत नसल्याने ते भाविक या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनापासून वंचित राहतात,त्यांची सोय झाल्याने यावेळी तमाम भाविकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी देवस्थान ट्रस्ट व पोलिस स्टेशन यांचेकडून भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सर्व प्रकारे खबरदारी घेण्यात आली,जेणेकरून तमाम भाविकांची स्वयंभू शिवलिंगाच्या सुलभ दर्शनाची उत्तम सोय झाली…..
छायाचित्र :
