• माण खटाव तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थान .•पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला झुकते माप
____________________________________

म्हसवड विजय टाकणे.
माण खटाव मधून आमदार जयकुमार गोरे यांना मंत्री पद मिळाल्यामुळे जल्लोष निर्माण झालेला आहे. मात्र माझ्या विकासाचा शिवधनुष्य आमदार जयकुमार गोरे उचलणार काय .? अशा स्वरूपाची चर्चा सामान्य नागरिकांमधून होत आहे.
सातारा जिल्ह्यातील पाच आमदारांना मंत्रिपद मिळाल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये जल्लोष
सातारा जिल्हा प्रथमच पाच मंत्री मिळाले असून मंत्रिमंडळाचे विस्तारामध्ये पाच जणांना संधी मिळालेली आहे.
यामध्ये माण तालुक्यातून प्रथमच आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्री पदी निवड झाल्याची घोषणा झाली असून त्यांच्या निवडीमुळे माण खटाव तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघातील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मिळाले असून सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी त्यांची वर्णी लागलेली आहे.
सातारा जिल्ह्यातील मूळ निवासी असणारे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदी निवड झाली आहे.
शंभूराज देसाई – यांना पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय मंत्री पद मिळाल्यामुळे
पाटण तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
वाई मतदार संघातील मकरंद आबा पाटील यांना मदत व पुनर्वसन हे
मंत्रिपद मिळाल्यामुळे वाई तालुक्यातील जनतेत जल्लोष करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील या पाच सुपुत्रांना मंत्री पद मिळाल्यामुळे सातारा जिल्ह्याला या वेळेला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात झुकते माप मिळाल्यामुळे साताऱ्याचा विकास मोठ्या प्रमाणात होणार असे अपेक्षा लोकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील पाचही आमदार मंत्री झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील जनतेमध्ये आनंदच वातावरण निर्माण झालं असून पहिल्यांदाच सातारा जिल्हा पाच मंत्री पद मिळालेली आहेत.
माण तालुक्याला गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच ग्राम पंचायत राज या मंत्रिपदाची संधी मिळाली आहे .
तर यापूर्वी महादेव जानकर यांना मंत्रीपद मिळालेले होते. यानंतर पुन्हा एकदा आमदार जयकुमार गोरे यांच्या मंत्रीपदामुळे माण खटाव विधानसभा तालुक्यातील जनतेच्या अशा पल्लवीत झालेला असून विविध रखडलेल्या योजना व नवीन औद्योगिक वसाहत सुरू होण्यासाठी गती मिळणार आहे.
यामुळे या तालुक्यातील दुष्काळ हटणार असून माण तालुक्यातील अर्धवट राहिलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी आमदार जयकुमार गोरे अधिक प्रयत्नशील राहतील असे लोकांची अपेक्षा आहे.
आमदार जयकुमार गोरे यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये माण तालुक्यात पाणी प्रश्नासाठी केलेला संघर्ष आणि पन्नास हजार मतांनी निवडून आल्यामुळे त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे.
यामुळे माण तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्यास माण खटाव तालुक्याला नक्की न्याय मिळेल असे अपेक्षा व्यक्त होत आहे. माण तालुक्याचा विकासाचे शिवधनुष्य
आमदार जयकुमार गोरे उचलणार की काय अशा प्रकारची चर्चा सुरू असून पंधरा वर्षात आमदार जयकुमार गोरे यांनी जनतेतील विश्वास कायम राहण्यासाठी मोठा संघर्ष केला असून पन्नास हजार पेक्षा मतानी जनतेनी विजय मिळवून दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील कर्तुत्वान आमदार म्हणून त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिलेली आहे.
हे पाहता आमदार जयकुमार गोरे यांच्या बाबतच्या अपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढल्या असून आमदार जयकुमार गोरे यांना पुढील काळामध्ये अधिक सक्षमपणे काम करणे आवश्यक आहे.
……
सामान्य कुटुंबातील मुलगा मंत्री.
तरुणांचे प्रेरणास्थान – जयकुमार गोरे.
आमदार जयकुमार गोरे हे सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील बोराटवाडी तालुका माण येथे रेशनिंग दुकान चालवत होते. अतिशय संघर्ष करून त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेले आहे 2009 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी पहिल्यांदाच माण तालुक्यातील किंग मेकर असणारे तत्कालीन माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचा पराभव करून विधानसभा जिंकलेली होती.
यानंतर सलग चार वेळा त्यांनी विजय मिळवलेला असल्यामुळे माण तालुक्यात त्यांनी तरुणांचे प्रेरणास्थान स्थान म्हणून नावलौकिक मिळवला असून त्यांच्या वेगळ्या स्टाईल मुळे ते प्रसिद्ध आहेत. सतत संकटावर मात करून संकटा लाख संधी समजून पुन्हा पुन्हा नव्याने ते अधिक सक्षमपणे उभे राहिले आहेत. यामुळे त्याची संघर्ष शील व्यक्ती म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते विजयी झाले होते त्यानंतर सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान त्यांनी मिळवलेला आहे. त्यांच्यावर अनेक वेळा संकटं आली मात्र त्या वर मात करून मंत्री पदापर्यंत मजल मारलेली आहे.
…..