
म्हसवड (प्रतिनिधी)
देशाच्या सीमांवर सतत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत, आपल्या शूर सैनिकांनी अविरत जागरूकतेने भारतमातेचे आणि देशवासीयांचे संरक्षण करत आपल्या प्राणांचे अर्पण करण्यास देखील मागेपुढे पाहिले नाही. या सैनिकांच्या अद्वितीय शौर्याला, निस्सीम देशभक्तीला आणि अमोघ सेवाभावाला विनम्र अभिवादन करण्यासाठी, त्यांचे मनोबल व आत्मविश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड शहरात भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती .
पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य पाकिस्तान मध्ये घुसून त्यांचे नऊ दहशतवादी अड्डे उध्वस्त केले 100 पेक्षा जास्त अतिरेक्यांना खात्मा करण्यात आला. देशाच्या सक्षम पंतप्रधानांनी या हल्ल्यानंतर सांगितले आहे येथून पुढे असे हल्ले झाल्यास त्याची पुनरावृत्ती आमच्याकडून युद्धाकडून होईल. दोन दिवसांमध्ये पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैनिकांचे अभिनंदन करण्यासाठीऑपरेशन सिंदूर” च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ म्हसवड शहरात भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यातआले होते,भारत माता की जय, वंदे मातरम,भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा देत तिरंगा ध्वज हाती घेत सैन्याबद्दल प्रोत्साहनपर घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी मा.आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य डॉ.संदीप दादा पोळ,मा.जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा) ,ज्येष्ठ नेते हरिभाऊ जगदाळे, कृषीउत्पन्न बाजार समिती माण मा. सभापती विलासराव देशमुख,मा.जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे, सुनील पोरे साहेब,राजू (आप्पा) पोळ, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी,ओ.बी. सी युवामोर्चा मा. प्रदेशाध्यक्षा करणभैय्या पोरे.भाजपा माण तालुका मा.अध्यक्ष बाळासाहेब मासाळ,माण तालुका महिलामोर्चा अध्यक्ष सौ.अर्चना सावंत,भाजपा माण तालुका (म्हसवड मंडल) अध्यक्ष प्रशांत गोरड, माण तालुका (दहिवडी मंडल) अध्यक्ष गणेशशेठ सत्रे, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, म्हसवडचे मा.नगराध्यक्ष नितीन दोशी,मा.नगराध्यक्ष विजय धट ,मा.नगराध्यक्ष डॉ.वसंत मासाळ ,युवानेते बाळासाहेब पिसे,लुनेश विरकर,कायदा आघाडी अध्यक्ष ॲड, दत्तात्रय हांगे,आप्पासाहेब पुकळे,भारतीय जनता पार्टी, अल्पसंख्याक आघाडीमोर्चा सातारा जिल्हाअध्यक्ष अकील काझी, डॉ . प्रदीप गावडे, डॉ.संजय सावंत,माण तालुका अनुसूचित जातीजमाती मोर्चाआघाडी अध्यक्ष नरवणे गावचे उपसरपंच रवींद्र तुपे, सयाजी लोखंडे, विजय साखरे,वसंत गोरड , मा.नगरसेवक सविता मासाळ, काकासाहेब माने, वडूज नगरीचे मा. नगरसेवक श्रीकांत (काका) बनसोडे, निलेश कर्पे, रत्नदीप शेटे,अमोल माने, जवाहर काळेल, माण तालुका युवामोर्चा सरचिटणीस राहुल भोसले, आकाश मेंढापुरे, सुनील खांडेकर,अनिकेत लांब , रोहित लिंगे, महेश खडके, अण्णासाहेब कोळी, नितीन शिंदे, प्रकाश खाडे दिनेश गोरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी भाजपाचे ज्येष्ठनेते,कार्यकर्ते,राष्ट्रप्रेमी आणि नागरिकांनी माता _भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय सैन्याच्या शौर्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
OperationSindoor #TirangaYatra #Jaykumar Gore BJP
