औंध यमाई देवी डोंगराला मिनी महाबळेश्वरचा फील

Spread the love

औंध प्रतिनिधी- ओंकार इंगळे

खटाव तालुक्याच्या बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे खटाव तालुक्यात व औंध भागात गेले सात ते आठ दिवसापासून पावसाची रिपरिप आहे त्यामुळे वातावरण अगदी थंडगार झाले असून अगदी धुक्यानी अंगावर चादर ओढावी असे वातावरण असल्याने औंध गावातील यमाई डोंगरावरील मुळपीट परिसराला मिनी महाबळेश्वरचा फील आला आहे मे महिन्यातच पडणाऱ्या संतधार पावसामुळे खटाव दुष्काळ पट्ट्यात मोसमी पावसाचे वातावरण झाले आहे दरवर्षी मे महिन्यात खटाव तालुक्यातील जनतेला कडक उन्हाचे चटके सोसावे लागतात या वर्षी मात्र औंध गावात तसेच खटाव तालुक्यात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे गेल्या आठवड्यापासून औंध परिसरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे यमाई देवी डोंगरावर धुक्याची झालर पसरल्याचे दिसत आहे डोंगरावर जात असताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे डोंगरावर असणारे यमाई देवीचे मंदिर दिवसभर दाट धुक्यात हरवलेले असते यमाई देवीला येणारे भावीक पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत आहे गेल्या आठवड्यापासून पावसामुळे डोंगर रांगेतून पाण्याचे लोट वाहत आहेत दरवर्षी श्रावणात पडणाऱ्या संतधार पावसाच्या सरी यावर्षी वैशाख वनव्यात अनुभवता येत असल्याने औंध जनता सुखावली आहे आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे पेरण्यासाठी योग्य वेळेत पाऊस होत असल्याने तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे परंतु कांदा शेतकऱ्यांच्या तर भुईमूग शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!