फुले एज्युकेशन तर्फे 53 वा मोफत सत्यशोधक विवाह वांगी येथे संपन्न झाला .

Spread the love

चक्क अमावास्या दिनी महात्मा बसवेश्वर आणि अहिल्याराणी होळकर यांचे जयंतीनिमित्त लिंगायत माळी परिवाराचा सांगली मध्ये झाला सत्यशोधक विवाह !!!

सांगली /वांगी . फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र व सत्यशोधक प्रबोधन महासभा महाराष्ट्रातर्फे महात्मा बसवेश्वर (891वी) आणि अहिल्याराणी होळकर(300वी) यांचे जयंतीनिमित्त सोमवार दि.26 मे 2025 रोजी दु.1 वाजता साईनाथ मंगल कार्यालय ,वांगी येथे कडेगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष परशुराम तुकाराम माळी ,वांगी यांचे सत्यशोधक विजय माळी (BA) , आणि समाजसेवक सहदेव धोंडीबा माळी ,मालगाव यांची सत्यशोधिका पूनम माळी (Msc.CS), यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने पदवीधर आमदार अरुण लाड ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख, अखिल भारतीय माळी महासंघाचे उपाध्यक्ष विठ्ठल तोडकर ,शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, मोहनराव यादव अॅड प्रमोद पाटील , क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू अॅड सुभाष पाटील,हल्ला बोल चित्रपटाचे निर्माते मोहन बनसोडे कलाकार नाना म्हेत्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनच्या उपस्थितीत वधू-वरांना शुभ आशीर्वाद देत चक्क अमावस्या दिवस असताना देखील वधू पूनम हिचा 26 मे वाढदिवस हाच मुहुर्थ समजून मोठ्या दिमाखात अंधश्रद्धा कर्मकांड यास तिलांजली देत प्रबोधनात्मकपणे मोफत संपन्न झाला.
या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हे नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पाडले तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सुदाम धाडगे व हनुमंत टिळेकर यांनी महात्मा फुले रचित मंगळाषटके चे गायन केले. यावेळी वधू वर याना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम वरील मान्यवर मंडळी व संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले . तसेच वधू वर यांचे आई वडील व मामा मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सन्मान पत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी सभामंडपात भारताचे संविधान ,व महात्मा फुले समग्र वाड्मय हातात धरून फुलांच्या पायघड्यावरून पारंपारिक वाद्याचे गजरात वधूवर – पूनम,विजय यांचे आगमन मंचावर झाले.त्यांचे शुभहस्ते प्रथम थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तर आईवडील, मामा मामी व इतर मान्यवरांचे हस्ते महात्मा बसवेश्वर,अहिल्याराणी होळकर,शिव,शाहू,आंबेडकर, संत शिरोमणी सावता महाराज ,संत गाडगेमहाराज ,क्रांतिसिंह नाना पाटील या महापुर्षांचे फोटोना हार अपर्ण करून राष्ट्रीय ग्रंथाचे पूजन करण्यात आले. तर विजय आणि पूनम यांचे कडून धन धान्याचे पूजन व दोघांना आदर्श जीवनाचे संस्काराचे ,जबाबदारीचे आणाभाका देत 7 वचने ,शपथा दिल्या आणि शपथा मान्य असल्याचे सर्वांचे साक्षीने दोघांचे सह्या घेण्यात आले. विवाह प्रसंगी विधवा महिलांना मानसन्मान देत त्यांचे सह आलेल्या सर्व मान्यवरांना महापुर्षांचे ग्रंथ भेट देण्यात आले. यावेळी अक्षता म्हणून फुलांचे पाकळ्या वापरण्यात आले.यावेळी शेतकरी संघटनेचे व सत्यशोधक विद्रोही चळवळीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याचे आयोजक परशुराम माळी यांनी हा सोहळा यशस्वीपणे व अतिशय शांतेत व प्रबोधनात्मक पार पाडला म्हणून प्रा.प्रतिमा परदेशी यांचे व ऐतहासिक विवाह सोहळ्यास आलेल्या सर्वांचे आभार मानले,तर मोलाचे सहकार्य सत्यशोधक सुप्रिया व विक्रम माळी आणि सत्यशोधक अॅड.जयराज माळी डॉ.सुप्रिया सावंत , संतोष शिद,जेष्ठ पत्रकार सदानंद माळी, आर पी आय चे नेते महादेव ओहाळ यांचे झाले. तसेच सूरसंगम ऑर्केस्ट्रा चे सौ नीता व श्री.संतोष वरूडे यांनी महापुर्षावर गीते गायल्याने मोठी रंगत आली. त्यामुळे या विवाहाची परिसरामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!