पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विनायक शिंदे यांना इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ जाहीर

Spread the love


फलटण : महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यात नावाजलेले मराठी हिंदी दैनिक अहिल्याराज वर्धापन दिन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ साठी फलटण येथील विनायक शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विनायक शिंदे यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे.
दैनिक अहिल्याराज वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ चे आयोजन करण्यात येते. यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर , वकील ,महिला, सहकार, पतसंस्था, कला या क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये फलटण येथील पत्रकार विनायक शिंदे यांची निवड पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील इंडियन एक्सलन्स अवार्ड साठी करण्यात आली असून दि. १ जून २०२५ रोजी मलकापूर (बुलढाणा) येथील भातृ मंडळ हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते विनायक शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
विनायक शिंदे हे गेल्या ३० वर्षापासून दैनिक ऐक्य फलटण विभागीय कार्यालय येथे कार्यरत आहेत. विनायक शिंदे हे दैनिक स्थैर्य येथे बातमीदार साप्ताहिक फलटण टुडे उपसंपादक साप्ताहिक फलटण रक्षक येथे उपसंपादक पदावर यापूर्वी काम केले आहे. सन २०२१ ला महा डिजिटल मिडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना केली असून प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!