केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे हस्ते संत शिरोमणी नामदेव महाराज विश्व महासंमेलन लोगो चे अनावरण

Spread the love

म्हसवड प्रतिनिधी
संत शिरोमणी नामदेव महाराज विश्व महासंमेलन नागपूर येथे जानेवारी 2026 मध्ये आयोजित करण्यात आले असून त्या संमेलनाच्या लोगोचे अनावरण नुकतेच केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांचे शुभ हस्ते करण्यात आले
‌‌ यावेळी भास्कर टोपे महाराष्ट्र राज्य नासपचे राज्य अध्यक्ष संजय नेवासकर सातारा जिल्हा नासपचे अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे ईश्वर धिरडे महेश मांढरे अनंत जांगजोड डॉक्टर अजय फुटाणे राजुभाऊ किटे प्रवीण शित्रे प्रमोद कोरमकर सुधर्मा खोडे सुनील जावरकर राजेश गंधे दीपक नानोटकर विलास मिरडे सुनील किटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
यावेळी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज विश्व महासंमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले पंढरपूर येथील नियोजित श्री संत नामदेव महाराज यांच्या स्मारकाची बाबत लेखी निवेदन देण्यात आले याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र देऊन लवकर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन गडकरी यांनी या वेळी दिले
या भेटीदरम्यान नामदार नितीन गडकरी यांचेशी विविध विषयांसह माण तालुक्यातील सातारा पंढरपुर महामार्गाच्या अपुर्ण पुल मोऱ्या व त्याचे पोहच रस्ते तात्काळ पुर्ण करावेत या संदर्भातही चर्चा करण्यात आल्याची माहिती नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!