विज कंपनीच्या डिजीटल मिटरला ग्राहकांचा तीव्र विरोध

Spread the love


म्हसवड दि. १
विज वितरण कंपनीच्या डिजीटल मिटरला शहरातुन तीव्र विरोध होवु लागल्याने या कंपनी ने सध्या ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला असुन ग्रामीण भागातील सामान्य जनतेला वरुन आदेश असल्याची बतावणी करुन ग्रामीण घरातील कर्ती व्यक्ति घरी नसल्याचे पाहुन त्यांच्या घरात डिजिटल मिटर बसवण्याचा सपाटा या कंपनीच्या ठेकेदारांकडुन सुरु असुन याला आता ग्रामीण जनतेतुनही तीव्र विरोध होत आहे.
गत काही महिन्यापुर्वी विज वितरण कंपनीने म्हसवड शहरात काही ठिकाणी डिजीटल मिटर बसवण्यास सुरुवात केली त्यावेळी विजग्राहकातुन याला विरोध झाला तेव्हा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याची माहिती घेतली असता विज वितरण कंपनीने जबरदस्तीने हे मिटर बसवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली. एरव्ही एखादा विज ग्राहक आपल्याला विज‌मिटर बदलुन देण्यासाठी वांरवार या कंपनीच्या कार्यालयाच्या पायर्या झिजवताना दिसुन येतो त्यावेळी याच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी विजमिटर शिल्लक नाही, तुम्हीच मिटर आणा मग विज कनेक्शन देतो असे आजवर सांगताना आपण अनेकदा पाहिले वा अनुभवले आहे, असे असताना ग्राहकांची कोणतीही तक्रार नसताना अचानक विज कंपनीने ग्राहाकंचे विज मिटर बदलण्याचा सपाटा लावल्याने अनेकांनी याबाबत शंका उपस्थित केली ग्राहकांची ही शंका जागरुन नागरीकांनी उचलुन धरत शहर कार्यालयातील अधिकार्यांना याबाबत घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केल्याने अधिकार्यांनी शहरातील घरांमध्ये विज मिटर बसवण्यास थांबवले. त्यानंतर काही दिवस जाताच पुन्हा या कंपनीने शहरांतर्गत येणार्या ग्रामीण भागात आपला मोर्चा वळवला असुन ग्रामीण भागातील घरांमध्ये महिला वर्ग एकटी पाहुन आम्ही कंपनीकडुन आलो असुन आम्हाला वरुन आदेश आहेत की आपल्या घरातील विज मिटर बदलावा लागेल अशी बतावणी करुन ग्रामीण भागातील घरांमध्ये सर्रासपणे मिटर बसवण्यास सुरुवात केली आहे.
वास्तविक सुरुवातीच्या काळात शहरामध्ये काही ठिकाणी हे डिजीटल मिटर बसवले आहेत त्यांना आलेले विजबील पाहुन अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. पुर्वीपेक्षाही पाचपट विजबील विज ग्राहकांना आल्याने शहरातुन या डिजीटल तीव्र विरोध झाला आहे. शहरातील नागरिक याबाबत जागरुक झाल्याने अनेकांनी या कंपनीच्या ठेकेदारांच्या कर्मचार्यांना अक्षरशा हाकलुन लावले आहे. आता तेच ठेकेदार कर्मचार्यांनी ग्रामीण भागातील घरांमध्ये आपला मोर्चा वळवला असुन त्याठिकाणी मिटर बदलण्याचा सपाटा लावला आहे. मात्र हे डिजीटल मिटर सामान्य विजग्राहकांचा आर्थिक पिळ काढणारे ठरले असल्याने असे मिटर ग्राहकांनी बसवु नयेत, विज मिटर बसवण्यास आलेल्या कर्मचार्यांना विरोध करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनांकडुन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!