
म्हसवड वार्ताहर
-पंढरपूर – सातारा रस्त्यावर जवळपास– पळशी येथील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साधारण 6.15 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वृद्ध बाळा बाई दत्तात्रय गंबरे (वय 68) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती लताबाई हनुमंत खाडे (वय 60) गंभीर जखमी झाली आहे.
हा अपघात मौजे पळशी ता. माण जि. सातारा येथील पिराची टेकडी देवी मंदिराजवळील रोडवरील साईटपट्टीवरून पंचेचाळीस फाटा ते पळशी रस्त्यावर घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या ठिकाणी दोन्ही महिलांचा पायी चालत असताना मागून येत असलेल्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या INTRA पिकअप वाहनातून अज्ञात चालकाने भरधाव वेगाने, हायगईने व रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मागे जोरदार धडक दिली.
या धडकेत दोघींना गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला; जखमी झालेल्या लताबाई खाडे यांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी तातडीने घेतले गेले, मात्र बाळा बाई दत्तात्रय गंबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नं. 274/2025 अंतर्गत BNS कलम 106(1), 106(2), 281, 125(A), 125(B) व वाहन कायदा कलम 184, 134(A), (B) प्रमाणे करण्यात आली आहे. आरोपी अद्याप अज्ञात असून त्याच्या ताब्यासाठी तजवीज ठेवण्यात आली आहे.
फिर्यादी प्रकाश नाना खाडे (वय 48, व्यवसाय शेती, रहिवासी पळशी, ता. माण, जि. सातारा) यांनी हा गुन्हा नोंदविला असून, अधिक माहिती व तपास पोलीस उप निरीक्षक वाघमोडे (मो. 9970970838) आणि सपोनि सोनवणे (मो. 9970717712) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे
पोलीस ठाणे म्हसवडकडून नागरिकांना विनंती करण्यात येते की रस्त्यावर वाहन चालवताना नियमांचे पालन करावे व अशा प्रकारच्या अपघातापासून बचावासाठी दक्षगिरी बाळगावी. आरोपी अज्ञात चालकाचा शोध लवकरच लावण्यात येईल व त्याला कायदेशीर कारवाईला ताब्यात घेण्यात येईल,
अशी माहिती देखील पोलीस प्रशासनाने दिली आहे.
…
तपास पोलीस उपनिरीक्षक अनील वाघमोडे हे करीत आहेत.
मोबाईल नंबर —9970970838
……..
.