
महाराष्ट्राचे कुलदैवत व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरी मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील शेवटचा रविवारी श्रावण मास निमित्ताने म्हसवड येथील सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात काम करणारे शुभम भारत गॅस एजन्सीचे सर्वेसर्वा इंजि. सुनील पोरे व त्यांच्या पत्नी सुवर्णा पोरे या परिवाराने आजची दहि भात व फळे आणि फुलांची अआकर्षट अशी वेगळी विशेष पुजा मंदिरात सजवली होती.
सध्या श्रावण महिन्यातील शेवटचा वार सुरू असून रविवार हा म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या व महाराष्ट्रातील दक्षिण काशीचे मंदिर म्हणून परिचित असलेल्या श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिरात प्रत्येक आमवस्या, पौर्णिमा आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी वेग वेगळे अभिषेक भक्त मंडळी पुजा म्हणून देवाला घालतात कोणी दही भाताचा, कोणी खाव्याचा अभिषेक घालतो तर कोणी चंदनाची उठी उगळून श्रींना चंदनाचा लेप लावून अभिषेक घालतात असे बरेच अभिषेक भक्त घालतात तर कोणी आंबा, सफरचंद, नारळाची सजावट करतात त्याच प्रमाणे विविध फुलांनी गाभाऱ्यात सजावट भक्त करतात आजची ही पुजा इंजि. सुनील पोरे सुवर्णा पोरे परिवाराकडुन श्रींना, अभिषेक ,पोशाख आणि मंदिरामध्ये फळांची आरास करून दहिभाताची महापूजा रात्री महाआरती प्रदक्षिणा पायघड्या व रांगोळी हि कलाकार महेश सोनवले यांनी केली