माळशिरस वार्ताहर…
वेळापूर ता. माळशिरस, येथील सौ. सुचिता अमोल घाडगे (वय ३९ वर्षे) यांनी सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत मयत सौ. सुचिता यांचे भाऊ हेमंत एकनाथ साळुंखे यांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल पती अमोल घाडगे व सासू सुनंदा दिलीप घाडगे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
…
माझी बहीण सुचिता अमोल घाडगे वय ३९ वर्षे रा. वेळापूर, ता. माळशिरस हिचे लग्न झालेनंतर २०१० पासून ते दि. ०३/१२/२०२४ रोजी पर्यंत तिला १) पती – अमोल दिलीप घाडगे २) सासू – सुनंदा दिलीप घाडगे दोघे रा. वेळापूर यांनी मिळून बहीण सुचिता हिस “तु आमचे ऐकत नाही, उलट का बोलते, तुझे चारित्र चांगले नाही, मुलाकडे लक्ष देत नाही, परपुरुषासोबत बोलते, तुझे बापाकडून किराणा सामान घेवून ये, तु धंद्यावर जा, कोणाखाली तरी पड जा” व तिचे चारित्रावर संशय घेवून तिला घालून पाडून बोलून शिवीगाळी करून लाथाबुक्यांनी मारहाण करून तिला शारीरीक व मानसिक त्रास देवून तिचा जाचहाट छळ केला. त्या छळास कंटाळून बहीण सुचिता अमोल घाडगे वय ३९ वर्षे रा. वेळापूर, ता. माळशिरस हीने राहत्या घरातील बेडरूममधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. म्हणून माझी अमोल दिलीप घाडगे २) सुनंदा दिलीप घडगे दोघे रा. वेळापूर यांचेविरूध्द भाऊ याने वेळापूर पोलीसात फिर्याद दिली आहे.अधिक तपास वेळापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत.