
म्हसवड दि. २०
सर्वसामान्य जनतेवर होणार्या अन्यायाला वाचा फोडणारा पत्रकार हा समाजाचा व पिडीत, शोषीतांचा प्रतिनिधी म्हणुन काम करीत असतो असे मत म्हसवड येथील सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उमा शेटे यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनानिमीत्त येथील सरस्वती विद्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी नर्मदा चँरिटेबल ट्रस्टचे प्रमुख हिरालाल शेटे, संस्थेचे उपाध्यक्ष अनिकेत शेटे, म्हसवड प्रेस क्लब चे अध्यक्ष महेश कांबळे, उपाध्यक्ष सचिन सरतापे, जेष्ठ पत्रकार विजय टाकणे, शहाजी लोखंडे आदी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. शेटे म्हणाल्या की सदरचे विद्यालय सुरु करताना म्हसवड च्या पत्रकारांची आम्हाला चांगली साथ मिळाल्यानेच आज ज्ञानाचे हे रोपटे याठिकाणी रुजु लागले आहे. विद्यालयाच्या शिक्षकांवर व प्रशासनावर सर्वांनी विश्वास दाखवल्यानेच आज हे शिक्षणाचे रोपटे हळुहळु आकार घेवु लागले आहे. गत ५ वर्षापासुन या विद्यालयाने इ.१० वी व १२ च्या १०० टक्के निकाला ची नवीन परंपरा सुरु केली असुन यंदा ही परंपरा कायम राखण्यात आमच्या विद्यालयाला यश मिळेल असा विश्वास ही यावेळी सौ. शेटे यांनी व्यक्त केला.
ज्ञानदानाचे काम विद्यालयात चालते विद्यालयात विद्यार्थी घडवण्याचे काम चालते तर समाज घडवण्याचे काम हे नेहमीच पत्रकार करीत आले असल्यानेच समाजात पत्रकाराचे अढळ स्थान आहे, समाजासाठी नेहमीच झटणार्या पत्रकारांचाही सन्मान व्हावा यासाठी आमच्या विद्यालयाने केलेला हो छोटा सा प्रयत्न असल्याचे विचार विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष हिरालाल शेटे यांनी व्यक्त केले.
यावेळी म्हसवड प्रेस क्लब चे अध्यक्ष महेश कांबळे बोलताना म्हणाले की आज सरस्वती विद्यालय हे जरी छोट्याशा जागेत भरत असले तरी येथील शिक्षणाची गुणवत्ता सर्वोत्तम असल्यानेच १०० टक्के निकालाची परंपरा येथे सुरु आहे. शैक्षणीक गुणवत्तेच्या जोरावर भविष्यात या विद्यालयाचे विशाल वटवृक्षात निश्चित रुपांतर होईल असा विश्वास यावेळी पत्रकार कांबळे यांनी व्यक्त केला.
जेष्ठ पत्रकार विजय टाकणे म्हणाले की विद्यालयाचे संस्थापक व मुख्याध्यापिका यांनी हे विद्यालय सुरु करण्यासाठी खुप मेहनत व संघर्ष केला असुन मोठ्या संघर्षातुन उभारलेले हे विद्यालय निश्चीतच भविष्यात वटवृक्षाप्रमाणे विशाल होईल यात शंका नाही. उपाध्याय सचिन सरतापे यांनी सुरुवातीच्या काळात सदर विद्यालयाला आपण ही मदत केल्याचे सांगत यापुढेही मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विद्यालयाच्या वतीने म्हसवड प्रेस क्लब च्या नुतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्तावित हिरालाल शेटे यांनी केले तर आभार कोर्हे मँडम यांनी मानले.
फोटो –