
म्हसवड (वार्ताहर )
ग्रामस्थांनी दिलेल्या शुभेच्छा आणि सन्मानामुळे मला अधिक काळ कार्यरत राहण्यासाठी उर्जा मिळेल. असे विचार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
बोराटवाडी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
नामदार जयकुमार गोरे यांचा महाराष्ट्राच्या ग्रामविकास व पंचायतराज मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तसेच आषाढी एकादशी वारी सोहळ्याचे उत्कृष्ट आणि प्रभावी नियोजन केल्याबद्दल बोराटवाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी सपत्नीक उपस्थित राहून ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाचा स्वीकार करून उपस्थित सर्व ग्रामस्थांचे या सन्मानाबद्दल त्यांनी आभार मानले.
“न भूतो, न भविष्यति” अशी यंदाची आषाढी वारी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात यंदाच्या आषाढी वारीचे अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावी नियोजन केले.अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे संपूर्ण वारीला अभूतपूर्व भव्यता आणि दिव्यता प्राप्त झाली.पंढरपूरप्रती असलेली निष्ठा आणि आस्था अनुभवून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनाला विशेष आनंद वाटला. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
उपस्थित मान्यवर बोराटवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन आणि मनःपूर्वक कौतुक केले. गावच्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार स्वीकारण्याचा अत्यंत पवित्र व सत्कार केला
यावेळी त्यांचे मोठे बंधू अंकुश (भाऊ) गोरे , सौ.भारतीताई गोरे, सातारा जिल्हा परिषद मा.सदस्य मा.श्री.अर्जुन (तात्या) काळे, श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा) , श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय काका गांधी, आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे, सातारा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष किसन सस्ते, बाळासाहेब पिसे, ह.भ.प.भास्कर पवार महाराज (आळंदीकर), बोराटवाडी गावचे मा. सरपंच आप्पासाहेब बोराटे, किरण गोरे, संतोष गोरे, संतोष बोराटे,जगन्नाथ बोराटे,सुधीर गोरे, श्रीकृष्ण बोराटे,अरुण भुजबळ, सुनील भुजबळ, विक्रांत गोरे ,विक्रम गोरे, बापूराव भुजबळ , संदीप बोराटे, दीपक बोराटे ,संकेत भुजबळ, हेमंत गोरे, निलेश दौलत गोरे यांच्यासह आदी मान्यवर, ग्रामस्थ माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.