वृक्षारोपण
म्हसवड प्रतिनिधी
निसर्गाचा समतोल साधण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष प्रेम वाढविण्यासाठी आयडीबीआय बँक शाखा म्हसवड तर्फे क्रांतिवीर शाळेत विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले .
आयडीबीआय बँक शाखा म्हसवड तर्फे सामाजिक बांधिलकी च्या माध्यमातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर , आयडीबीआय बँक म्हसवड शाखाधिकारी वैभव मंडले., दिपाली पाटील, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी, दिवसे दिवस वाढणाऱ्या तापमानाचे नियमन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष प्रेम वाढवण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे बँक शाखाधिकारी वैभव मंडले यांनी सांगितले. या निमित्ताने क्रांतिवीर शाळेच्या प्रांगणात शेवगा व इतर विविध रोपांची लागवड करण्यात आली. संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांचे हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बँक कर्मचारी यांच्याबरोबरच क्रांतिवीर संकुलातील शिक्षक ,विद्यार्थी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी बँक कर्मचारी प्रतीक कोकरे , रमण पडघम , बिकी रॉय, सागर पाटील, नारायण त्रिगुणे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . उपस्थितांचे आभार पुनम जाधव यांनी व्यक्त केले.
क्रांतिवीर शाळेत वृक्षारोपण करताना आयडीबीआय बँकेचे मॅनेजर वैभव मंडले व विश्वंभर बाबर


