देश-राज्य कोणत्या दिशेकडे चालला आहे ?अनिल वीर यांचा खडा सवाल

Spread the love
(मार्गदर्शन करताना अनिल वीर शेजारी गणेश भिसे व मान्यवर)

सातारा : सर्व सामान्य जनतेसाठी कार्य करण्यापेक्षा आपापसातच कुरघोड्या करीत आहेत.तेव्हा देश-राज्य कोणत्या दिशेकडे जात आहे? असा खडा सवाल बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी केला आहे.
येथील पोलीस करमणुक केंद्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव गणेश भिसे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात अनिल वीर बोलत होते.यावेळी विविध पक्ष- संघटनांच्यावतीने मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
अनिल वीर म्हणाले,
“वंचितचे सर्वेसर्वा ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर निष्ठावंत असलेले गणेश भिसे यांनी पोलस्टारप्रमाणे पक्षात अढळ स्थान निर्माण केले आहे. बहुजनामध्ये अनेक पक्ष-संघटना आहेत.काहीजण सोयीनुसार अथवा परिस्थितीनुसार इकडून-तिकडे उड्या मारत असतात.त्यामुळेच चळवळी मोडकळीस आलेल्या आहेत.तेव्हा आगामी निवडणुकांसाठी सर्व बहुजनांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. तात्विक वाद-विवाद असले तरी पक्षविरहीत एक झाले पाहिजे. मतभेद बाजुला ठेवले तरच प्रस्थापितांची सत्ता घालविण्यास मदत होईल.तेव्हा वॉर्ड/गण/गट आदी ठिकाणी ज्याचे वर्चस्व असेल त्यास स्थान देवुन यश खेचुन आणता येईल.”
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, वंचितचे शहराध्यक्ष मिलिंद कांबळे, महारुद्र तिकुंडे,रिपाई गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे,सचिव सुहास मोरे व महासचिव चंद्रकांत कांबळे,अमर गायकवाड,कृष्णा गव्हाळे, सतीश कांबळे, किशोर गाल्फाडे, संजय नितनवरे,आदित्य गायकवाड,सादिकभाई जगदीश कांबळे,वामन गंगावणे, दीपक चव्हाण, कांबळे सर (कोल्हापूर) आदी मान्यवर, कार्यकर्ते,युवक व महिला मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.
जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे,योगेश कांबळे,बबन करडे व गणेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.गणेश भिसे यांनी मनोगतासह आभार मानले. सरतेशेवटी मिष्ठान भोजनांनी सांगता करण्यात आली.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!