औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिम्मित औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथील अण्णाभाऊ साठे या मंडळाच्या वतीने जयंतीच्या अनावशक्य खर्चाला फाटा देऊन जमा केलेल्या रकमेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंध या शाळेला पहिलीच्या वर्गासाठी टीव्ही, व पेनड्राईव्ह भेट दिली आहे. डिजिटल युगात सर्वसामान्य कुटुंबातील मुले स्मार्ट झाली पाहिजेत नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवला गेला कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत माजी सदस्य तानाजी इंगळे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रवीण जी इंगळे,माधव इंगळे, सुहास इंगळे,रोहित इंगळे, मंदार कुंभार,अतुल इंगळे,कुलदीप इंगळे,अमोल इंगळे मुख्यघ्यापिका वाडेकर मॅडम,संग्राम गोसावी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.