.
लोणंद (प्रतिनिधी )-
‘विजयोउत्सव’ वार्षिक बक्षीस समारंभ नुकताच जालना येथे पार पडला. डॉ. सुरेश साबू यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आर आय डी 31 32 मधील सर्व क्लब ने केलेल्या मेहनतीचा आनंद उत्सव कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळेस मागील वर्षी रोटरी क्लब लोणंद केलेल्या कामाबद्दल तब्बल 12 बक्षीसे क्लबला प्रदान करण्यात आले. यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यासाठी बेस्ट आय केअर प्रोजेक्ट ची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. बेस्ट प्रेसिडेंट डायमंड अवॉर्ड रोटरी क्लब लोणंदचे अध्यक्ष रो प्रवीण चांदवडकर यांना प्रदा न करण्यात आला. तसेच रो. डॉक्टर विजयकुमार देशमुख यांना सुपरस्टार रोटरीन असा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर सेव गर्ल चाइल्ड, डिस्टिक एम्पसिस मधील रोड सेफ्टी, मेंबरशिप डेव्हलपमेंट, परसेंटेज मेंबरशिप ग्रोथ, आर आय साईटेशन, डीजी साईटेशन, फलटण तालुका नवीन रोटरीक्लब चालू केल्याबद्दल न्यू क्लब स्पॉन्सर, ऑल रोटरी क्विझ इत्यादी अवार्ड प्रधान करण्यात आले. मागील वर्षी रोटरी क्लब लोणंदने जवळपास 175 प्रोजेक्ट पूर्ण केले. याकरता चांदवडकर वाच अँड ऑप्टिशियन संपूर्ण स्टाफ, बुधरानी हॉस्पिटल पुणे यांचा संपूर्ण स्टाफ, रयते विद्यार्थी बॅच 1993/ 95 इनरव्हील क्लब लोणंद, चार्टर मेंबर रो विश्वनाथ शानबाग, रोटरीचे आधारस्तंभ डॉ, रो. देशमुख, पीडीजी इस्माईल पटेल, सचिव गोपाल खंडारे,डॉक्टर अनिल राजे निंबाळकर डॉक्टर किशोर बुटियानी, डॉक्टर दयाराम सूर्यवंशी डॉक्टर सतीश जगताप, यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.