जिल्हा प्रशासन सलाईनवर आंदोलकांच्या आले जीवावर…

Spread the love


(अजित जगताप)
सातारा दि: भारत देशामध्ये लोकशाही टिकून आहे. ती भ्रष्टाचार वाढल्यामुळे असं म्हणण्याची पाळी सातारा जिल्ह्यात आहे. कारण ,लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उलट, भ्रष्टाचारी कसा चांगला? हे सांगण्यासाठी जिल्हा प्रशासन सलाईन लावून बसले आहे. याची प्रचिती सातारा येथे पाहण्यास मिळत आहे. आंदोलकांच्या जीवावर बेतलेल्या आंदोलनाने लोकशाही मरण यातना भोगत आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार पाहणाऱ्या सातारा जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयासमोर अनेक आंदोलन होतात. बावन्न पत्त्यामध्ये तीन, दोन, पाच असा एक खेळ आहे. त्या पद्धतीने काही बहुचर्चित आंदोलने होत असतात. यामध्ये पाच प्रश्न हाती घ्यायचे. दोन प्रश्न सोडवायचे आणि तीन प्रश्नांमध्ये तोडपाणी करायची असे अनेकांना वाटते. अशा आंदोलनाची तातडीने जिल्हा प्रशासन चांगली काळजी घेते. त्यांना लिंबू सरबत देऊन पत्र सुद्धा देते. हे सुद्धा लपून राहिलेले नाही.
मात्र, राजकीय गॉडफादर नसलेल्या आंदोलनाचा अतिरेक किंवा सत्याचा अधिक आग्रह केल्यानंतर जिल्हा प्रशासन व संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करते आणि या दुर्लक्षित पणाची ताकद वाढवण्याचे काहीजण इमानेइतबारे काम करत असतात. सध्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका वयोवृद्ध फडके नावाच्या इसमाने पावणे तीन वर्षे आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्या फाळके यांचे निधन झाले असले तरी त्यांचा आंदोलनाचा प्रश्न सुटला नाही. हा भाग वेगळा आहे .
सातारा जिल्ह्यात व्यक्तिगत व सामुदायिक आणि लोक हताचे अनेक तरी अनेक आंदोलन हे कष्टकरी दलित, शोषित, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंगणवाडी सेविका, शेतमजूर आणि जिल्हा प्रशासनाने अन्याय केलेल्या लोकांसाठी असतात. नेमके या आंदोलनाचा फायदा तोटा कधीच उलगडला नाही.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने रीतसर निवेदन देऊन सुद्धा आंदोलक महेश शिवदास आणि रमेश उबाळे हे दोघे आंदोलन करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. माणुसकीच्या नात्याने किंवा आरोग्य विभागाचे कर्तव्य म्हणून आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना उपोषण सोडण्याचा सल्ला देतात. परंतु, ज्या गोष्टीसाठी त्यांचे उपोषण आहे. त्या प्रश्नाला काही महाभाग अधिकार चलाखीने बगल देत असतात. वास्तविक पाहता ज्यांच्यासाठी आपण आंदोलन करीत आहे.त्यातील नामांकित व सराईत लोक सुद्धा या आंदोलनाकडे फारसा गांभीर्याने बघत नाही. हे खास नमूद करावे वाटत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवी हत्तीसाठी तळमळ दाखवणे. हे रास्तच आहे. परंतु ,माणूस नावाच्या प्राण्याकडे त्याच दृष्टीने बघावे. अशी आता विनंती आंदोलकांनी केली आहे.
सातारा जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी यांनी ताम्रपट घेतलेले नाही. ज्या दिवशी ते सेवानिवृत्त होतील आणि त्यांच्यावर कळत नकळत असा अन्याय झाल्यानंतर आंदोलनाची वेळ येईल. त्यावेळी त्यांची जबाबदारी व कर्तव्य विश्लेषण करून त्यांच्यासाठी कोणीही धावून येणार नाही. हा देवाचा नियम त्यांनाही लागू पडेल. तेव्हा त्यांना नक्की समजेल असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.


चौकट — भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी अनेक जण आत्मदहन आंदोलनाला येथील त्यांच्यासाठी राबणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वर्षभर काय केले? याचा हिशोब द्यावा. अशी ही मागणी पुढे आलेली आहे.


चौकट — एका बाजूला सत्ताधारी
सायरनचा आवाज आणि दुसऱ्या बाजूला खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघातग्रस्तांना उपचारासाठी नेणाऱ्या रुग्णवहिनीचा आवाज अशी दोन टोकं पाहण्यास मिळत आहे.


फोटो ..

— सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले दोन आंदोलन व आरोग्य पथक (छाया– अजित जगताप सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!