कलेढोण मराठी शाळेने एक मूल एक झाड योजना राबवून परिसर सुशोभित करावा – सौ.सोनियाताई गोरे
– मायणी प्रतिनिधी—
कलेढोण येथील मराठी शाळेने एक मूल एक झाड ही योजना राबवून परिसर सुशोभित करावा असे आवाहन ना.जयकुमार गोरे यांच्या पत्नी व सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था दहिवडीच्या संचालिका सौ.सोनियाताई गोरे यांनी केले.त्यांच्या हस्ते कलेढोण येथील जि. प.मराठी शाळेस नवीन तीन खोल्या बांधण्यासाठी ना.जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून ३८लाख मंजूर झाले आहेत त्या खोल्यांच्या बांधकामाचे तसेच नाईक समाजाच्या खंडोबा मंदिर सभा मंडपासाठी ५ लाख मंजूर झाले,त्या सभामंडपाचे भूमिपूजन सौ.सोनियाताई गोरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर, माण मतदार संघ भाजपाचे अध्यक्ष सोमनाथ भोसले,माण खटाव महायुती समन्वयक विशाल बागल,खटाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनिल माळी,नानासाहेब पुजारी, कलेढोणच्या सरपंच सौ.प्रितीताई शेटे,सुहास शेटे,राजेंद्र कणसे,ग्रा. पं.सदस्या सौ. मनिषा कणसे,श्रीमती मुमताज तांबोळी,सौ.बशिदा मुलाणी,रफिक मुलाणी,सौ.कलावती साळुंखे,अमोल दबडे,बरकत शिकलगार,केतन महाजन,राजन लिगाडे,सयाजीराव पाटील,जालिंदर बुधावले,शामराव बुधावले,राजेंद्र बुधावले,मुख्याध्यापक सुनिल पवार,ओमप्रकाश माळी,राजेंद्र रसाळ,राजेंद्र बागल आदींची प्रमुख उपस्थिती होती. सौ.सोनीयाताई गोरे म्हणाल्या, कलेढोण जिल्हा परिषद मराठी शाळेस भव्य असे पटांगण आहे,याचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. या पटांगणावर जनावरांना खाता न येणारी झाडे लावावीत.प्रत्येक विद्यार्थ्याने एका झाडास पाणी घालावे.त्या झाडाभोवती कुंपण असावे.यासाठी शिक्षक व पालक यांनी सहकार्य करावे असे सांगून ना.जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून कलेढोणचा विकास होत असल्याचे सांगितले. माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर म्हणाले,मराठी शाळांना पूर्वी जीवन शिक्षण विद्या मंदिर असे नाव होते,ते बदलून आता जि.प.मराठी शाळा असे झाले.मराठी शाळेत पूर्वी चांगले शिक्षण मिळायचे.रात्री कंदिलाच्या उजेडात सुद्धा विद्यार्थी अभ्यास करायचे,त्यासाठी शिक्षक परिश्रम घ्यायचे.आज ही परिस्थिती बदलली आहे.मराठी शाळेचा पट कमी होऊ लागला. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे.पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घालावे.शाळेच्या नवीन ३खोल्यांचे बांधकाम चांगले कसे होईल यासाठी ग्रामस्थांनी लक्ष देणे गरजेचे आहे. खटाव तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष अनिल भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राजेंद्र लोखंडे यांनी आभार मानले.
-( फोटो – कलेढोण येथील मराठी शाळेच्या नवीन ३खोल्यांच्या बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी सौ.सोनियाताई गोरे, मा.आ.डॉ.दिलीपराव येळगावकर,सरपंच प्रितिताई शेटे,सुहास शेटे,सोमनाथ भोसले,विशाल बागल,राजेंद्र कणसे,राजेंद्र लोखंडे व इतर मान्यवर).