औंध वार्ताहर
खटाव तालुक्यातील औंध या गावातील पत्रकार ओंकार इंगळे यांनी १ ऑगेस्ट २०२५ रोजी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिवशीच सातारा जिल्हा अधिकारी यांना लेखी निवेदन देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना महाराष्ट्र राज्य, भारत सरकार यानी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे असे निवेदन देत मागणी केली आहे
अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार दिल्याने या पुरस्कारची शोभा वाढणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील वस्त्यांमध्ये जाऊन प्रवास प्रबोधनाच्या माध्यामातून स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्व सामान्याना कळेल अशा सोप्या भाषेत प्रबोधन करणारे जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यानी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत
आण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहून व चित्रपट, कथा लिहुन देशाला मोठे योगदान दिले आहे. अशा परिवर्तनवादी महापुरुषाला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे जेणेकरून त्यानी केलेले कार्य येणाऱ्या पिढीला प्रेरित करेल
या आधीही अनेक संघटना, कार्यकर्ते, समाजसेवक यांनी आवाज उठवला आहे परंतु महाराष्ट्र सरकार, व केंद्र सरकार यांनी झोपेचे सोंग घेतलेले असावे त्यामुळे आता सरकारने जागे होऊन या मागणीचा विचार करत पुढील कार्यवाही करावी हि विनती.