
म्हसवड: वार्ताहर –
येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या निमित्ताने मोफत नगर वाचनालय, म्हसवड नगरपालिका आणि मल्हार नगर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मोफत नगर वाचनालय येथे आयोजित कार्यक्रमात कुर्ला नागरी सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि कामगार नेते विठ्ठल भाई विरकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमातून दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
शहरातील मल्हार नगर येथेही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी म्हसवड येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील थोर व्यक्तिमत्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी युवक नेते करण भैय्या पोरे उपस्थित राहिले यावेळी त्यांचे समवेत मित्र मंडळ व उत्सव समिती बांधव उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यासोबतच व्याख्यान आणि प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमातून अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. या कार्यक्रमांमुळे म्हसवडमधील वातावरण भारावून गेले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली .