म्हसवड दि. ३
सातारा जिल्ह्यात हिंदु – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणुन ओळखल्या जाणार्या म्हसवड येथील लक्ष्मी गणेश मंडळाने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा केला असुन, यंदाही या मंडळाने वृक्षारोपन करुन एक नवा आदर्शत असा उपक्रम साजरा केला आहे असे मत येथील डँशींग पोलिस अधिकारी स.पो.नि. अक्षय सोनवणे यांनी व्यक्त केले.
म्हसवड शहरातील लक्ष्मी गणेश मंडळाने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की म्हसवड पोलिस स्टेशन अंतर्गत १०३ सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जात आहेत, मात्र म्हसवड शहरातील लक्ष्मी गणेश मंडळाची बातच न्यारी आहे, या मंडळाने आज वर अनेक सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोणत्याही प्रकार ची आर्थिक वर्गणी न जमावता या मंडळाने कार्यकर्ते हे स्वखर्चातुन हा गणेशोत्सव साजरा करतात, या मंडळात विविध जाती, धर्माचे युवक कार्यकर्त़े असुनही कोणताही वाद, विवाद आजवर या मंडळाने केला नाही त्यामुळेच हे मंडळ आदर्श मंडळ ठरले आहे.
यंदाही या मंडळाने वृक्षारोपनासारखा सामाजिक उपक्रम हाती घेत प्रत्यक्षात समाजोपयोगी वृक्षांची लागवड केली आहे, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे , तर या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुसते वृक्षारोपण केले नाही तर ते वृक्ष जोपासण्याची जबाबदारीही स्विकारलेली आहे. या मंडळाने राबवलेल्या या उपक्रमाचा आदर्श इतर गणेश मंडळांनीही घ्यावा असे आवाहन शेवटी स.पो.नि. सोनवणे यांनी केले. यावेळी लक्ष्मी गणेश मंडळाचे अध्यक्ष संतोष धुमाळ, उपाध्यक्ष गणेश कांबळे, रोहन कांबळे, गणेश कोळी, इम्रान मुल्ला, संदिप भोसले, अमोल कांबळे, सुरज सुतार, पो. हवा. अभिजीत भादुले, अमर नारनवर, खाडे आदी उपस्थित होते.
फोटो –
