
“आनेवाडी टोल नाक्यावर महिलां कर्मचाऱ्यांकडून मनमानी राज – स्थानिक वाहनचालक त्रस्त,प्रशासन झोपलेल्या अवस्थेत”?
सातारा-जावळी तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या सातारा-आनेवाडी टोल नाक्यावर सध्या वाहनचालकांच्या त्रासाची परिसीमा गाठली आहे. टोल वसुलीसाठी नेमलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून मनमानी व उद्धट वागणूक दिली जात असून, त्यांचा अडाणीपणा, वाहने ओळखण्याची अक्षम्यता आणि गैरव्यवहार यामुळे स्थानिक वाहनचालक संतप्त आहेत.”ज्यांना गाडीचा नंबर कळत नाही, अशा महिलांना टोलवर भरलंय!” अशी थेट तक्रार नागरिक करत आहेत. टोल कर्मचाऱ्यांकडून दहा किलोमीटरच्या परिसरातील स्थानिक वाहनधारकांना देखील अडवून, त्यांच्यासोबत वाद घालून जबरदस्तीने टोल वसूल केला जात असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत.महिलांमार्फत अभद्र बोलणे, चौकशीस नकार देणे, गोंधळ घालणे, पत्रकारांशी असभ्य पणे बोलणे,अकार्यक्षमता आणि टोलधारक नियमांची सर्रास पायमल्ली – हे सर्व आनेवाडी टोल नाका आता ‘मनमानी टोल नाका’ बनल्याचे चित्र आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन गप्प, त्यामुळे संताप आणखी वाढत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी, जिल्हा प्रशासनाने आणि NHAI ने तत्काळ लक्ष घालावे, अन्यथा नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात जाणार असल्याचा इशारा दिला आहे.