जत, दि. २९ जुलै २०२५ : सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (रजि.) दिल्ली, शाखा जत यांच्या वतीने रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी श्री.एस.आर.व्ही.एम्. हायस्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज जत येथे सकाळी ठीक ९ ते सायं. ६ या वेळेत विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्तसंकलन सांगली सिव्हिल व मिरज सिव्हिल येथील रक्तपेढी यांच्यामार्फत करण्यांत येणार आहे. संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदान शिबिराची ही शृंखला २३ ऑक्टोबर १९८६ पासून सुरू झाली असून दरवर्षी २४ एप्रिल रोजी मानव एकता दिवस या दिवसापासून संपूर्ण विश्वात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते, याच अनुषंगाने जत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संत निरंकारी मंडळाचा रक्तदानाचा हा सामाजिक पैलू मनुष्यमात्राच्या मनामध्ये मानवतावादी भावनांना उद्योन्मुख करत आहे. तरी रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान या महान मानवी कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्थानिक जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे सेवादल संचालक संभाजी साळे यांनी केले आहे.