
म्हसवड : वार्ताहर
जिल्हा परिषद अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात तात्काळ बैठक लावावी अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिली असल्याची माहिती इंजिनियर सुनील पोरे यांनी दिली
महाराष्ट्र राज्य संघटनेचे माझी कार्याध्यक्ष सुनील पोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील ग्रामविकास मंत्री यांच्या दालनामध्ये अभियंता संघटनेचे शिष्टमंडळ यांनी नुकतीच नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेतली या वेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष सुहास धारासुरकर कार्याध्यक्ष सचिन चव्हाण उपाध्यक्ष किसन साळुंखे महेंद्र अहिरे संघटक नागेश चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते
यावेळी नामदार जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद अभियंता सवर्गाच्या प्रलंबित मागण्याच्या अनुषंगाने राज्याचे ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांना तात्काळ बैठक लावण्याची आदेश देण्यात आले आहेत
अभियंता संघटनेचे शिष्टमंडळास नामदार जयकुमार गोरे यांनी तात्काळ बैठक लावण्याचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्या लवकरच सुटतील असे असे मत संघटनेचे राज्याध्यक्ष सुहास धारासुरकर यांनी व्यक्त केले असून संघटनेचे माजी कार्याध्यक्ष सुनील पोरे यांच्या माध्यमातून पुढील बैठक घेण्यात येणार असून प्रलंबित मागण्यांचा निश्चितच निपटारा होईल अशी आशा व्यक्त केली आहे