सुनील दबडे यांच्या ” बनगी आणि बिरमुटं ” . या कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार

Spread the love

लातूर येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीतर्फे माणदेशातील सुप्रसिद्ध साहित्यिक सुनील दबडे यांच्या ” बनगी आणि बिरमुटं ” . या कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .
२६ एप्रिल रोजी लातूर येथे विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात दबडे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे . याबाबत अकादमीचे सचीव प्रकाश घादगिने यांनी एका पत्राव्दारे दबडे यांना कळविले आहे .
सुनील दबडे यांच्या या कथासंग्रहाचे प्रकाशन विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते झाले होते . फलटण येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व शेळवे पंढरपूर येथील राज्यस्तरीय रानशिवार साहित्य पुरस्कार या कथासंग्रहाला नुकतेच मिळाले आहेत .
” बनगी आणि बिरमुटं ” या कथासंग्रहातून माणदेशातील बदलत्या परिस्थितीचे प्रभावी चित्रण या पुस्तकातून करण्यात आले आहे . त्यामुळे या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे .
दबडे यांची यापूर्वी पाच पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांना राज्यातील अनेक प्रतिष्ठेचे साहित्य पुरस्कार मिळाले आहेत . दबडे यांनी शासनाच्या अनेक उपक्रमांत परिचर्चेत सहभाग घेतला आहे . विविध विषयांवर शेकडो व्याख्याने दिली आहेत . दबडे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक केले जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!