औंधच्या कुस्ती मैदानात चमकला छोटा मल्ल श्रीकेदार

औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
कुस्ती’ हा रांगडा खेळ. बल आणि बुद्धीचा संगम घडवत खेळला जाणारा खेळ आहे. शक्ती बरोबरच बुद्धीचातुर्याचा कसबी वापर करणारा खेळाडू हा मल्लयोद्धा, पैलवान म्हणून गणला व ओळखलं जातो. अगदी अनादी काळापासून कुस्ती जगभर खेळली जाते. औंध संस्थानच्या कुस्ती मैदानालाही एक ऐतिहासिक आणि अनन्य साधारण महत्त्व आहे. श्री यमाई देवी मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात बाळराजे तालीम संघाचा नारायण इंगळे यांचा नातू पाच वर्षाचा छोटा मल्ल श्रीकेदार अमोल इंगळे याने श्री यमाई देवी यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात आपले कुस्तीचे कसब दाखवले या प्रसंगी सर्व कुस्ती शौकिनांनी त्याला वाहवा व शाबासकीची थाप दिली .औंधच्या मातीतून असेच मल्ल तयार व्हावेत अशी अपेक्षा यावेळी कुस्ती शौकीनांकडून करण्यात आली.