पंढरपूर प्रतिनिधी

समस्त शिंपी समाजाच्या एकत्रीकरणासाठी अखिल भारतीय संत नामदेव एक संघाची स्थापना संपूर्ण महाराष्ट्रातील शिंपी समाजातील सर्व पोट जातींना एका छताखाली एका मंचावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष व माजी प्रदेशाध्यक्ष ॲड.महेश ढवळे यांनी जे सहकार्य ,परिश्रम व संकल्प केले असून गेल्या 2 वर्षभरामध्ये त्याला चांगले यश प्राप्त झाले आहे . यासाठी अजून जोमाने कार्य करण्यासाठी व महाराष्ट्राच्या समस्त शिंपी समाजाच्या तळागाळातील बांधवांसाठी सामाजिक शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय व समाजातील समाज मंदिर जीर्णद्धाराच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा, कोकण ,मुंबई ,उत्तर महाराष्ट्र , खान्देश ,विदर्भ, या भागातील समाजातील नामदेव ,अहिर, वैष्णव ,माहेश्वरी ,भावसार, मेरू, तेलगू या पोटजातीतील सर्व समाज बांधवांना एकाच छत्रछायेखाली व एका व्यासपीठावर आणण्याचा संकल्प नुकताच मुंबई येथे संत नामदेव महाराजांचे 16 वे व 17 वे वंशज ह भ प मुकुंद महाराज ह भ प ज्ञानेश्वर व निवृत्ती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये संत नामदेव महाराज स्मारक व केशवराई मंदिराचा जीर्णोद्धार तसेच शिंपी समाजातील प्रलंबित विषयांना त्यांना देण्यासाठी आगामी जुलै महिन्यात संत नामदेव महाराजांच्या 675 वा संजीवन समाधी सोहळा भव्य प्रमाणात घेण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला व हा कार्यक्रम भारतातील सर्व समाज बांधवांना बोलवून भव्य करण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त करण्यात आला या संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांना एका बॅनरखाली आणण्यासाठी अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघ या माध्यमातून कार्य करण्याचे ठरले व याची घोषणा संत नामदेव महाराजांचे वंशज यांनी केली.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक माजी राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब पाथरकर, ज्येष्ठविधीतज्ञ अजय तलवार ,केशवराव संस्थेचे अध्यक्ष रुपेश खांडके, सचिव धनंजय जंवजाळ, पंढरपूर समाज अध्यक्ष गणेश उंडाळे,तसेच महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून आलेले मनोज भंडारकर जळगाव, नितीन बाविस्कर शिरपूर गजेंद्र शिंपी नंदुरबार, अशोक खैरनार मुंबई, रुपेश बागुल, मालेगाव कोल्हापूर पुणे येथील समाज बांधव,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.