लोणंद (प्रतिनिधी)–
खेमावती नदि स्वच्छता मोहीम संदर्भात शहरातील नागरिकांनी व लोणंद नगरपंचायत प्रशासनाने खेमावती नदिकाठी जाऊन स्थळ पाहणी केली.सर्वानी समक्ष पाहणी करून झाडेझुडपे, बाभळी, कचरा, पानवेल, काढून प्रवाह सुरळीत करण्याचे ठरले. हि स्वच्छता मोहिम लोकसहभागातून असल्यामुळे तिथे उपस्थित असलेले १) लोणंद नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मा. मधुमती गालिंदे- १०,००० रुपये २)लोणंद नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी – २१०० रुपये 3)शिवाजीराव शेळके-पाटिल – १०,००० रुपये -४)रविद्र क्षीरसागर व दशरथ जाधव – ५१०० रुपये ५)लोकसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेश भाटिया – २० लीटर डिझेल दिले. खेमावती नदी स्वच्छता मोहीम मध्ये पहिल्याच दिवशी मदतीचा ओघ सुरु झाला. मदत केलेल्या पदाधिकारी, नागरिक यांचे नगरपंचायत प्रशासनामार्फत आभार. गजेंद्र मुसळे यांनी खेमावती नदि स्वच्छता मोहिम मध्ये पोकलॅड दिला. त्यांचे विशेष आभार मानले.
. या मोहीमेत जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे.
असे आवाहन मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले..
