बीड येथे अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघातर्फे गंगानाथ आर्थिक विकास महामंडळ नावा ऐवजी श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी आर्थिक विकास महामंडळ हे नाव शासनाने दिल्यामुळे फटाके वाजवून पेढे भरून शासनाचे जंगी आभार
बीड (प्रतिनिधी) नाथपंथी गोसावी समाजा तर्फे समाजाच्या विकासासाठी अहोरात्र जटणारे व्यक्तिमत्व मा. डॉ. जयाजीनाथ साहेब राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री दिगंबर डवरी साहेब प्रदेशाध्यक्ष तसेच माननीय श्री विश्वनाथ साहेब महासचिव महाराष्ट्र राज्य तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील नाथपंथी महासंघाचे कार्यकर्ते यांनी गंगानाथ आर्थिक विकास महामंडळ हे नाव नाथपंथी तसेच नवनाथांच्या चरित्र ग्रंथातही नसल्यामुळे शासनाने श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी आर्थिक विकास महामंडळ हे नाव द्यावे यासाठी उठाव केला होता या उठावाची दखल शासनाने घेऊन महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस तसेच वनमंत्री गणेशजी नाईक यांनी मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त या समाजाला वरील नाव देऊन एक प्रकारची भेट दिली आहे
म्हणून बीड जिल्ह्यातील अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ अध्यक्ष सचिव सर्व सदस्य यांनी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरून शासनाचे आभार मानले.