अखेर म्हसवड पोलीसांनी धाडस केलं
११२ लोकांना तडीपार नोटीस ७० जणांवर कारवाई.
म्हसवड वार्ताहर
सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या आदेशानुसार
म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय सखाराम बिराजदार यांनी अखेर धाडस करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे व तडीपार करण्याच्या नोटीस जारी केल्या असून यामध्ये म्हसवड पोलीस स्टेशन ने केलेल्या कारवाई बद्दल लोकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
म्हसवड शहरात पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या 112 लोकांना तडीपारची नोटीस बजावण्यात आली असून 70 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे .
अशी माहिती सपोनी बिराजदार यांनी दिलेली आहे. अनेक दिवसांपासून ही कारवाई प्रलंबित होती मात्र अखेर सपने बिराजदार यांनी धाडस दाखवून ही कारवाई केली आहे
विधानसभा 2024 चे निवडणूक अनुषंगाने उपद्रवी व अवैद्य धंदे करणारे लोकांच्यावर म्हसवड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनी बिराजदार व सर्व बिट अमंलदार यांनी म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील उपद्रवी 112 लोकांच्या वरती तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच BNSS कायद्यान्वये 126 प्रमाणे 70 लोकांच्या वर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
निवडणूक कालावधीमध्ये कोणतेही प्रकारच्या भंग होणार नाही कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही.
याकरिता 477 लोकांच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा सहित कायदा कलम 168 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
अवैद्य दारू धंदे करणारे यांच्यावरती 19 केसेस करून चार हजार पाचशे लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
तसेच मुंबई पोलीस अधिनियम कायदा कलम 93 प्रमाणे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे.
रस्त्यावर आरडाओरडा करणारे व लोकांच्या वरती दबाव आणणारे 20 लोकांच्या वरती कारवाई करण्यात आली आहे.
म्हसवड पोलीस स्टेशनची ही कारवाई तात्पुरती न करता वारंवार करावी अशी मागणी केली जात आहे.
म्हसवड एसटी बस स्थानक परिसरात सतत वाहतूक कोंडी होते आहे. मात्र इथे वाहतूक पोलिस नसल्याने परिसरातील वाहतूक ठप्प होते. तर रस्त्यावर लागलेल्या वाहनांमुळे गर्दी असते. यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होतो आहे.
तर स्टँड परिसर नो पार्किंग झोन करावा अशी मागणी केली जात आहे.