मंत्री जयकुमार गोरे व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्यात विविध विषयांवर चर्चा


मुरूम, ता. उमरगा, ता. १ (प्रतिनिधी) :
येथील माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी (ता.१) रोजी दुपारी सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी पाटील परिवाराकडून माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते मंत्री जयकुमार गोरे यांचा विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रकाश आष्टे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, कैलास शिंदे, रफिक तांबोळी, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, सचिन पाटील, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशिद शेख, विकासेसो चे माजी चेअरमन दत्ता चटगे, पप्पू सगर, महेश माशाळकर, विजय सोनकटाळे, योगेश राठोड, व्यंकट कोरे, विक्रम मस्के, देवेंद्र कंटेकुरे, परमेश्वर टोपगे, प्रशांत गायकवाड, महालिंग बाबशेट्टी, संजय पाटील, शिवराज पाटील आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी उपकार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, शाम गोडबोले, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि संदीप दहिफळे, मुख्याधिकारी सचिन भुजबळ आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बसवराज पाटील व मंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये उमरगा-लोहारा तालुक्यातील विविध प्रश्नांवर व विकास कामाच्या संदर्भात विस्ताराने चर्चा करण्यात आली. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील पाटील यांच्या निवासस्थानी विजयकुमार गोरे यांचा सत्कार करताना बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरण पाटील, संताजी चालुक्य व अन्य पदाधिकारी.