गोंदवले (विजय ढालपे)
‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’ या भक्तिभावाने संपूर्ण परिसर न्हावून निघाला.
गोंदवले – माण तालुक्यातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र गोंदवले बु. येथे ‘श्री राम जय राम जय राम’ या नामस्मरनांच्या जयघोषात श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या १११ व्या पुण्यतिथी महोत्सवाची आजपहाटे ५वाजुन ५५ मिनिटानी समाधीवर गुलाल पुष्प अर्पण करुण सांगता झाली. ‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’ या भक्तिभावाने संपूर्ण परिसर न्हावून निघाला, पहाटेच्या ऐन थंडीत सुध्दा हाताने टाळीचा गजर अन मुखाने हरिनामाचा जप करीत भाविक तल्लीन झाले.
महोत्सवास लाखो भाविक मुंबई, पुण्यासह पर राज्यातून, तसेच माण तालुक्यातील परिसरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. १६ डिसेंबरला कोठी पूजनाने प्रारंभ झालेला हा उत्सव गेल्या दहा दिवसापासुन भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात सुरू होता. समाधीवर अखंड रामनाम जप सुरू होता,रामनामाचे स्मरण जप करीत यावेळी समाधी वर अन्नदान महाप्रसादाचे भोजन कक्षात आयोजन सुरू होते, त्याचा भावीकानी आस्वाद घेतला.भावपूर्ण वातावरणात पुण्यतिथीची सांगता होत असताना संपूर्ण मंदिर परिसर गजबजून गेला होता.
ब्रम्हचैतन्य महाराज समाधी मंदिर परिसरात आकर्षित विध्युत रोशनाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघाला होता.सोहळ्या निमित्त श्रींच्या समाधी मंदिराची चांगल्या प्रकारे सुंदर सजावट करुन मंदीराच्या संपुर्ण शिखरासह परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.पहाटे २वाजून ३० मिनिटांनी मंदीर मुख दर्शनासाठी खुले करण्यात आले.पहाटे सव्वातीन वाजता मंदीरात पहिली घंटा करण्यात आली. साडेतीन ते चार वाजता सनईचे मंजुळ वादन करण्यात आले, चार ते पाऊणेपाच भुपाळी काकड आरतीनंतर मंगल धुन सनईने सुरुवात करुन धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. मुख्य समाधी मंदीरात महाराजांच्या समाधीला वस्त्र चढवुन त्यावर तुळशी फुलेअर्पण करण्यात आली बरोबर पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी समाधी मंदीरातुन “श्रीराम श्रीराम श्रीराम” असा जयघोष सुरु झाल्यावर जमलेल्या लाखो भाविकानी मोठ्या चैतन्यमय प्रसन्नतेत समाधीवर गुलाल फुलांची उधळण केली.
आजच्या सोहळ्या दरम्यान राज्याचे ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती होती. समाधीवर फुले पडल्यानंतर त्यांनी श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधीचे दर्शन घेतले. समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी मंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत करून आदर सत्कार केला. यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणे, सरपंच जयप्रकाश कट्टे उपस्थित होते.

छाया – पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित आसलेला जनसागर ( विजय ढालपे)