मेघा इंजिनिअरिंग कंपनी विरोधातील श्री उबाळेंच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

Spread the love
फोटो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात श्री उबाळे यांच् आंदोलनाला वाढता पाठिंबा.. (छाया– निनाद जगताप, सातारा)


सातारा दि:
सातारा — पंढरपूर रस्त्याचे नवीन विस्तारीकरणाचे काम करत असताना प्राचीन वृक्षतोड करण्यात आलेली आहे . त्या जागी नवीन वृक्ष लागवड निविदा मध्ये दिसून येत आहे. परंतु, प्रत्यक्षात ते केले नाही. रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामांमध्ये दिरंगाई केल्यामुळे अनेक अपघात झाले त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई न करता हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे मनुष्यवधाच गुन्हा दाखल करावा
या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी उपोषण सुरू केले असून उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढून सुद्धा आंदोलन आंदोलनापासून ठाम आहेत एवढा संताप प्रवाशांमध्ये निर्माण झालेला आहे.
या कंपनीने निविदा नुसार कागदोपत्री दोन लाखाची वृक्ष लागवड करून रस्ते विकास नावाखाली ३० लाख रुपये बेकायदेशीर बचत केली आहे. एवढेच नव्हे तर एक गुन्हा पचला म्हणून दुसरा गुन्हा म्हणजे या भ्रष्ट कंपनीने निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहे . रस्त्याला काही महत्त्वाच्या गावच्या हद्दीमध्ये भेगा पडलेले बुजवण्याचं काम सध्या चालू आहे. हा पुरावा असून सुद्धा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व गुणवंत नियंत्रक आणि संबंधित यंत्रणा कारवाई करण्यापासून अलिप्त राहिलेले आहे.
मेघा इंजीनियरिंग कंपनीने या रस्त्याचे काम काम करत असताना कोणत्याही पद्धतीचे सेफ्टी रुल्स फॉलो केलेले नाही. या रस्त्यावर आजपर्यंत ६४ प्रवासी मृत्युमुखी पावलेले आहेत.त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही स्वरूपाचे नुकसान भरपाई मिळालेली नाही. यंत्रणेशी हात मिळवणी करून आज तारखे अखेर एक ही सदोष मनुष्य वधाचा गुन्हा या कंपनीवर दाखल झालेला नाही. हा मोठा अभ्यास करण्याचा व संशोधन करण्याचा विषय आहे .
या रस्ता म्हणजे मौत का कुवा बनलेला आहे. निरापराधी प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी आमचे आंदोलन असून जर भ्रष्ट अधिकाऱ्यांना ही बाब किरकोळ वाटत असेल तर कंपनी इतकाच आम्ही लोकवर्गणीतून निधी देऊन त्यांची पैशाची भूक भागू असं या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष महेश रणदिवे, कोरेगाव तालुका अध्यक्ष रियाज मुलाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम गायकवाड, वैभव गवळी, अजय कदम, सलीम बागवान, राजेंद्र पोळ, नितीन राऊत, जमीर भोसले, उत्तम जाधव, किरण चव्हाण व सातारा, कोरेगाव, खटाव, माण तालुक्यातील चार चाकी दुचाकी वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.
मंगळवार दिनांक ६ मे पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते आमदार जोगेंद्र कवाडे सर, युवा नेते जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे व त्यांच्या समर्थकांनी तसेच प्रवाशांनी आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला पहिल्या दिवशी ५० विविध सामाजिक व प्रवासी संघटनेने पाठिंबा दिला आहे. यापुढेही आंदोलन तीव्र करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. दरम्यान, या आंदोलनाबाबत राज्याचे माजी मंत्री तसेच लोकप्रतिनिधींनीही संपर्क साधून पाठिंबा दर्शवला आहे. अशी माहिती आंदोलकांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!