
म्हसवड प्रतिनिधी
म्हसवड येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा म्हसवड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मंदिराचे विश्वस्त अशोक गुरव यांनी केलेले आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे
या सोहळ्याचा प्रारंभ शुक्रवार दिनांक 2025 पासून सुरु होणार असून समाप्ती 19/ 5/ 2025 रोजी करण्यात येणार आहे.
यानिमित्त व्यासपीठ चालक हरिभक्त परायण मोहन महाराज मोठे विभूतवाडी चोपदार राजाभाऊ लाडे महाराज म्हसवड करणार आहे सद्गुरु अमरनाथ बाबा कारखेल यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने दररोज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे या निमित्ताने मोहन महाराज मोठे महेश गायकवाड ,गोरखनाथ महाराज अशोक महाराज गुरव विष्णु महाराज टिळे हनुमंत महाराज गोरड सुरज महाराज जाधव यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे महाप्रसाद 16 मे रोजी करण्यात येणार आहे या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन हभप अशोक महाराज गुरव यांनी केले आहे.