सुभद्रा प्री-प्रायमरी स्कूलचा दहीवडीत दिंडी सोहळा संपन्न
बिदाल प्रतिनिधी दि
दहीवडी (ता. माण) येथे सुभद्रा प्री-प्रायमरी स्कूल यांच्यातर्फे भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दिंडीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक पोशाखात टाळ, मृदंग आणि अभंगाच्या गजरात दिंडी सादर झाली.
या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रम तीन ठिकाणी पार पडला – बाजारपटांगण, तीन बत्ती चौक, आणि शेवटी ग्रामदेवत सिद्धनाथ मंदिर येथे कार्यक्रम सादर करण्यात आला.
हातात भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा निनाद त्याला वीणाची साथ, ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबा रुख्मीनीचा जयघोष करीत गावातून निघालेल्या दिंडीने गावकऱ्यांचे लक्ष वेधले.विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांची आकर्षक आणि हुभेहुब वेशभूषा केल्याचं दिसून आलं
शाळेच्या शिक्षकवृंदांनी तसेच पालकांनीही या सोहळ्यात सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, सांस्कृतिक वारशाची जाणीव आणि सामाजिक ऐक्याचे भान निर्माण व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
फोटो ओळी

दहीवडीत येथे सुभद्रा प्री-प्रायमरी स्कूलचा दिंडी सोहळा संपन्न (छायाचित्र आकाश दडस