भाजप सातारा जिल्हाध्यक्ष पदासाठी चार डझन इच्छुकांची परीक्षा संपन्न..

Spread the love

अजित जगताप —सातारा—-

: केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्ष प्रणित सरकार असल्यामुळे निश्चितच सातारा भाजप जिल्हाध्यक्ष होण्यासाठी चांगलीच चढाओढ लागलेली आहे. सातारा शासकीय विश्रामगृहात चार डझन जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने नेमकी कुणाची निवड करावी? असा वरिष्ठांना प्रश्न पडला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता महायुती पक्षाचे सातारा जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप नेते व प्रचारक आणि बूथ प्रमुखांनी केलेल्या प्रचारामुळे लाडक्या बहिणींनी पण विजयासाठी हातभार लावला. त्यामुळे भाजपचे कमळ सर्वत्र संचार करत आहे. काही महायुतीतील घटक पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आज सातारा येथील नवीन शासकीय विश्रामगृहामध्ये माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, दत्ताजी थोरात, विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, सुनील काटकर, सुप्रियाताई शिंदे, सुवर्णाताई पाटील, शिवदास, मनीष महाडवाले, रवींद्र पवार, भरत पाटील, विजय काटवटे, सतीश भोसले, जयकुमार शिंदे, विकास गोसावी, सुनील काळेकर, अमोल कांबळे, प्रवीण शहाणे, मनोज शेंडे उपस्थित होते. यांच्यासह चार डझन सातारा जिल्हा अध्यक्ष इच्छुक यांना प्रश्नपत्रिका देऊन त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळवण्याची प्रयत्न सुरू झालेले आहेत. निष्ठावंत भाजपच्यासाठी ही परीक्षा अवघड नसली तरी नवे आणि जुने यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी कोणाचा पत्ता कट होणार? हे आधीच सिद्ध झाले आहे. आता फक्त औपचारिकता बाकी असून शुक्रवार दिनांक २ मे रोजी नूतन सातारा जिल्हा अध्यक्ष यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सातारा जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पक्षीय पातळीवर प्रदेश सरचिटणीस व निवडणूक पर्यवेक्षक राजेश पांडे, सातारा जिल्हा निरीक्षक व कसबेचे आमदार हेमंत रासणे यांनी प्रत्येकाचे मत समजून घेतले. भारतीय जनता पक्षाच्या स्वबळाचा नारा दिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कमळ फुलवण्यासाठी नेते इच्छुक झालेले आहेत. पण सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कराड सारख्या नगरीत दोन गट पडल्यामुळे मला नाही तर तुलाही नाही तिसरा चालेल हा सुद्धा पर्याय निर्माण झाल्याचे दिसून आल्यास नवल वाटणार नाही.या निवडीच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज व भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या निर्णय भाजपला बंधनकारक ठरणार असल्याचेही बोलले जात आहे.

फोटो सातारच्या नवीन शासकीय रुग्णालयात भाजप नवीन जिल्हाध्यक्षाच्या मुलाखती सुरू (छाया– अजित जगताप सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!