
सातारा ( वृत्तसेवा ) —सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या अंतर्गत सातारा तालुका पत्रकार संघाची आज सभा पार पडली. पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या एकमताने बिनविरोध निवडी करण्यात आल्या. यावेळी सातारा तालुका पत्रकार संघाचे
अध्यक्षपदी अजय कदम, उपाध्यक्ष विजय जाधव व सुनील साबळे, कार्याध्यक्ष बाळू मोरे, सचिव राहुल ताटे, सहसचिव गुलाब पठाण, खजिनदार वसंत साबळे, संघटक नितीन साळुंखे, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी कदम, तर कार्यकारणी सदस्य म्हणून प्रवीण राऊत आदींच्या निवडी करण्यात आला.
नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय अधिस्वीकृत समितीचे अध्यक्ष व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे तसेच शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सातारा तालुक्यातील विविध दैनिक व साप्ताहिकचे प्रतिनिधी उपस्थित होते.