बीड 28
नाथपंथी समाजाच्या उन्नतीसाठी गुरु गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. जयाची नाथ साहेब यांनी वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री मा. गणेशजी नाईक यांना विनंती करून शासनाकडून आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्यामुळे शासनाचे व मंत्रिमहोदय मा.गणेशजी नाईक यांचे स्वागत व आभार मानण्याचा कार्यक्रम मुंबई येथे पार पडला याप्रसंगी राज्य सदस्य . डॉ. के बी पैठणकर, ह भ प भरत महाराज जोगी तसेच बीड जिल्ह्याचे अध्यक्ष . भरत चव्हाण , सचिव हरिभाऊ भराडी, कार्याध्यक्ष संजय सावंत सर, युवा अध्यक्ष भैरवनाथ शिंदे ग्रामीण अध्यक्ष रंगनाथ पैठणकर, दत्तात्रय शिराळकर, सरपंच . बाबा पवार या कार्यक्रमासाठी मुंबई येथे उपस्थित होते या प्रसंगी नाथपंथी समाजाची नवनिर्वाचित निवड झालेले आयपीएस अधिकारी अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.