(अजित जगताप )
सातारा दि२५ : लोकनेते अण्णा हजारे यांनी सामान्य माणसांना प्रशासकीय कारभाराची माहिती व्हावी. यासाठी माहितीचा अधिकार आणला. परंतु ,सातारा जिल्ह्यात माहितीच्या अधिकाराचा काटेकोरपणाने वापर करण्याऐवजी खोटी माहिती व शुल्क भरल्याचे कारण सांगून माहिती दडवली जात आहे. या विरोधात साताऱ्यातील पंताचा गोठ येथील जागरूक नागरिक महेश अशोक शिवदास यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे आंदोलकांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू झालेली आहे.
याबाबत माहिती अशी की ,सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांनी वाहन मालक वाहन खरेदी घेणार व एजंट यांच्याशी संगणमत केल्याचा आरोप करून दिनांक २३ जानेवारी पासून श्री महेश शिवदास हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणाला बसलेले आहेत. पोलीस मुख्यालय सातारा शहर पोलीस ठाणे सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना निवेदन दिलेले आहे.
यामध्ये माहिती अधिकाराचा अधिनियम २००५ अंतर्गत येणाऱ्या बाबी स्पष्ट केलेले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा क्लब समोर सदर बाजार कॅम्प सातारा यांनी जावक क्रमांक/ १४० दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ प्रमाणे आपण मागितलेल्या माहितीच्या आधारे अपील क्रमांक१४ नुसार जुलै २०२४ ते आज अखेरपर्यंत ४३५९ इतक्या वाहनांच्या तपशिलाची माहिती प्रत्येक वाहनने प्रति वाहने वहीत शासकीय शुल्क रुपये ५० प्रमाणे भरणा केल्यानंतर आपल्याला माहिती देण्यात येईल असे जन माहिती आपली अधिकारी तथा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी महेश शिवदास यांना लेखी कळविले आहे. सदरचे पत्र दहा दिवसाच्या आत देणे बंधनकारक असताना सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक नुसार ते उशिरा देण्यात आले. असाही गंभीर आरोप श्री शिवदास यांनी केलेला आहे .
त्यामुळे त्यांनी विलंबाने पत्र मिळाल्यामुळे शुल्क भरण्यास नकार दिलेला आहे. वास्तविक पाहता माहितीच्या अधिकारात पारदर्शक कारभार असल्यामुळे कोणतीही माहिती देण्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होत नाही. उलट माहिती देऊन सत्य माहिती जनतेसमोर आणण्यासाठी संधी होती. ही संधी असूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. असाही आरोप करण्यात येत आहे. माहितीचा अधिकाराचा वापर करून शासकीय भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकाराचे समर्थक काम करत असतात. परंतु ,काही सराईत दलालांना हाताशी घेऊन अशा माहिती अधिकाऱ्याच्या वापर करणाऱ्या कार्यकर्त्याला बदनाम करण्यासाठी एक सक्रिय टोळी निर्माण झालेली आहे. या टोळीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून दिवाळी व इतर दिवशी लाभाच्या रूपाने हित साधले जाते. असाही गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनी दिनांक २६ जानेवारी रोजी दरवर्षी सातत्याने अनेक आंदोलन आत्मदहनाचा इशारा देतात. त्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनाला नाहक त्रास सहन करावा लागतो. ज्यांच्यावर खरोखरच अन्याय झाला असेल तर त्यांना लोकशाहीमध्ये न्याय मिळणे गरजेचे आहे परंतु काही ठराविक हेतूने आंदोलनाचे नाटक करतात त्यांची चौकशी केल्यानंतर अनेक गमतीदार गोष्टी बाहेर येतील. परंतु प्रामाणिक व सत्य बाजू असून सुद्धा त्यांना वेळेत न्याय मिळत नाही. मात्र अन्याय सहन करावा लागतो. हे सुद्धा यामुळे जनतेमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. या आंदोलनाकडे प्रसार माध्यमांनी लक्ष वेधून घेतल्यामुळे प्रसारमाध्यमालाही आंदोलकांनी धन्यवाद दिले आहेत.
_______________

फोटो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी बसलेले महेश शिवदास