म्हसवड वार्ताहर
जिल्हा नियोजन समिती सभागृह सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी
अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली .
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी तसेच नद्यांना आलेल्या महापुरामुळे जवळपास 792 गावांना फटका बसला असून त्यातील 40 गावांमध्ये पुराचे पाणी शिरलेले होते. या 40 गावातील हजारो लोकांना निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आलेले आहे. तरी या 40 बाधित गावांचे व तेथील नागरिकांचे जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी अत्यंत जबाबदारी पूर्वक काम करावे, असे आवाहन केले.
सध्या बाधित गावातील नागरिक निवारा केंद्रामध्ये राहत आहेत, परंतु आत्ता गावातील पुराचे पाणी कमी होत असून सर्व स्थानिक प्रशासनाने तसेच जिल्हास्तरीय प्रशासनाने बाधित असलेले सर्व 40 गावांचे व तेथील नागरिकांचे जनजीवन सुरळीत होऊन मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्व तातडीच्या उपायोजना राबवाव्यात. आरोग्य विभागाने सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी आरोग्य शिबारे आयोजित करावीत.
पाणीपुरवठा विभागाने त्या गावातील नागरिकांना तेवढा पिण्याचा पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे करावा. तसेच संपूर्ण पाणी कमी झाल्यानंतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी. सर्व ग्रामस्तरीय संबंधित विभागांनी एकत्रित येऊन सर्वप्रथम गावाची स्वच्छता करून घ्यावी. व साथीच्या रोगाचा प्रसार होणार नाही याचीही काळजी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.
जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरून मागवण्यात आलेल्या एकूण दहा बचाव पथकामार्फत पूर कालावधीत 4 हजार 350 नागरिकांना सुखरूप बाहेर काढून निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आले. अशा 76 निवारा केंद्र मधून स्थलांतरित केलेल्या या सर्व नागरिकांना प्रशासनाने जेवण, पाणी, आरोग्य सुविधा व अन्य अनुषंगिक बाबी उपलब्ध करून द्याव्यात. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.
तसेच प्रशासनाने अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये खूप चांगले काम केलेले असून या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक केले.
…
सर्व पात्र महिलांना लाडकी बहिण योजनेंतर्गत लाभ मिळावा: नगरसेवक अखिल काझी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत तहसीलदारांकडे निवेदन
माण तालुक्यातील अप्पर तहसीलदार सौ मीना बाबर यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, अनेक पात्र महिलांना तांत्रिक कारणे व आवश्यक माहितीच्या अभावामुळे या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून सर्व पात्र महिलांना योजनेंतर्गत लाभ मिळवून द्यावा.
तसेच महिलांमधील संभ्रम दूर करून, योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळावा यासाठी एकदिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली.त्यावेळेस तहसीलदार मॅडम यांनी सांगितले, ज्या महिलांनी आधार कार्ड अपडेट केले नाही त्यांनी आधार सिडिंग व ई. के वाय. सि करून घ्यावे. असणारे प्रॉब्लेम निकाली निघतील.
यावेळी विजय धट ,(माजी नगराध्यक्ष), नगरसेवक अकिल काझी नगरसेवक संजय सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लिंगे व रोहित लिंगे उपस्थित होते.
..