म्हसवड वार्ताहर -म्हसवड येथील प्रसिद्ध व्यापारी अजित शेठ व्होरा यांच्या धवल बंगला या इमारतीमध्ये गटार तुंबले मुळे पाणी साठलेलं आहे. नगरपालिकेने तातडीने याबाबत उपाययोजना करावी व गटार दुरुस्त करावी अशी मागणी म्हसवड चे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी नगरपालिका मुख्याधिकारी सचिन माने यांच्याकडे केलेली आहे.
म्हसवड शहरातील बांधण्यात येणाऱ्या गटारीचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे गटार वाहत नाहीत त्यामुळे आसपासच्या घरामध्ये पाणी शिरले आहेत
सातारा पंढरपूर रस्त्यावर असणाऱ्या अजितशेठ व्होरा यांच्या इन्फ्रा स्टील सेंटर या दुकानात पूर्णपणे पाणी शिरले असून शासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी सातारा, तहसीलदार माण यांना दिलेले आहे.
